Parag Tyagi : कांटा लगा गर्ल फेम शेफाली जरीवाला (shefali Jariwala) हिच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला . 27 जून 2025 रोजी शेफाली जरीवाला आपल्या चहा त्यांना सोडून गेली .वयाच्या 42 व्या वर्षी हार्ट अटॅक मुळे तिने प्राण सोडला . तिच्या मृत्यूनंतरचे अनेक व्हिडिओ समोर आले .शेफालीचा नवरा अभिनेता पराग त्यागी याने नुकताच एका यूट्यूब चॅनलवर शेफालीच्या पहिल्या भेटीपासून तिच्या शेवटच्या क्षणापर्यंतच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. शेफालीच्या मृत्यूबाबत अनेक खुलासेही त्याने केल्याने या पोडकास्टची सध्या चर्चा आहे .

Continues below advertisement

तिच्या ब्रशने दात घासतो, तिचे न धुतलेल्या कपड्यांमध्ये..

शेफाली जरीवालाचा मृत्यूनंतर पराग त्यागीचे अनेक व्हिडिओ समोर आले होते .नुकताच पॉडकास्टमध्ये पराग त्यागीने शेफालीच्या अनेक वस्तू जपून ठेवल्याचे सांगितलं .त्यानं सांगितलं की त्याच्याकडे अजूनही शेफालीचे न धुतलेले कपडे आहेत . तो आजही ते कपडे जवळ घेऊन झोपतो .शेफालीच्या मृत्यूनंतर दोन-तीन दिवसांपर्यंत तिच्या नावाने अनेक पार्सल येत होते . या पोडकास्ट ची एक छोटी क्लिप सध्या youtube वर व्हायरल होत आहे .ज्यामध्ये पराग म्हणतो, कल्पना करा ती गेल्यानंतर दोन-तीन दिवसांपर्यंत तिला ॲमेझॉन फ्लिपकार्ट वरून वेगवेगळ्या ऑर्डर येत होत्या . मी त्या घेतल्या .मी तिच्याच टूथब्रश ने दात घासतो .तिच्या उशीवर झोपतो .माझ्याकडे अजूनही तिचे न धुतलेले टी-शर्ट आणि शॉर्ट्स आहेत .जे मी माझ्याजवळ ठेवतो .

तुम्हाला माहिती आहे ती गेल्यानंतर आमच्या धुण्याच्या बास्केटमध्ये तिचे कपडे ठेवले होते .ते मी माझ्याकडेच ठेवले आहेत .त्या कपड्यांमध्ये अजूनही तिचा सुगंध आहे .मी दररोज माझ्या टी-शर्ट भोवती तिचे कपडे गुंडाळून झोपतो . ते मी घालू शकत नाहीत कारण ते माझ्यासाठी लहान आहेत पण तिचा ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून मी झोपतो .

Continues below advertisement

काहीतरी चुकीचे घडण्याची चाहूल

ज्या दिवशी शेफालीचे निधन झाले त्या दिवशी काहीतरी वाईट घडणार असल्याची चाहूल मला लागली असल्याचं पराग त्यागी म्हणाला होता .शिफालीने त्याला सिंबाला बाहेर घेऊन जाण्यास सांगितले होते .जेव्हा तो सिंबाला घेऊन परतला तेव्हा त्यांच्या कंपाउंडर ने त्याला सांगितले की शेफाली बेशुद्ध पडली आहे . तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं कळल्यानंतर तिला सीपीआर दिला . इलेक्ट्रोलाईट पाणी देण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती पुन्हा श्वास घ्यायला लागली .त्यानंतर तिला तातडीने डॉक्टरांकडे घेऊन गेलो . दोन वेळा तिची नाडी तपासली मात्र तिचं शरीर पूर्णतः हार मानू लागलं होतं असं परागने सांगितलं .