Shefali Bagga On Dating Rumors With Yuzvendra Chahal: युझवेंद्र चहलसोबत रिलेशनशिपच्या चर्चा; पण 'बिग बॉस' फेम अभिनेत्री म्हणतेय, 'मला विराट कोहलीसारखाच पार्टनर हवा...'
Shefali Bagga On Dating Rumors With Yuzvendra Chahal: मला विराट कोहलीसारखा लाईफ पार्टनर हवाय, असंही म्हटलंय. नेमकं शेफालीनं केलेलं हेच वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे.

Shefali Bagga On Dating Rumors With Yuzvendra Chahal: 'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) मधील स्पर्धक आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर (Sports Presenter) शेफाली बग्गा (Shefali Bagga) काही काळापूर्वी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्या सोबत दिसली होती. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, शेफालीनं या सर्व चर्चा निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच, तिला विराट कोहली (Virat Kohli) सारखा लाईफ पार्टनर (Life Partner) हवाय, असंही म्हटलंय. नेमकं शेफालीनं केलेलं हेच वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याचप्रमाणे तिला तिचं प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफसोबत मिसळायचं नाही, असंही तिनं सांगितलंय.
युजवेंद्र चहलसोबतच्या अफेअरबाबत शेफाली बग्गा नेमकं काय म्हणाली? (Shefali Bagga On Dating Rumors Yuzvendra Chahal)
शेफाली बग्गानं फिल्मीज्ञानशी बोलताना युजवेंद्र चहलसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं. ती म्हणाली की, "या प्रश्नाचं उत्तर देऊन मला आता कंटाळा आलाय. मला आता यावर काहीही बोलायचं नाही. लोकांचे विचार खूप छोटे आहेत. लोक डिनरला डेटिंगचं नाव देतात. तो फक्त एक पापाराझी व्हिडीओ होता आणि लोक विचारत होतं की, शेफाली आणि युजवेंद्र डेट करत आहेत का? आमचं नातं काय आहे, ते मला माहीत आहे आणि या गोष्टींनी फरक पडत नाही..."
"मला कोणत्याही क्रिकेटरला डेट करायचं नाही. विराट कोहली आणि एमएस धोनी यांची मी फॅन होते. पण आता ते ऑप्शन माझ्याकडे नाहीत आणि बाकी दुसरे क्रिकेटर माझ्यापेक्षा लहान असतील. मला काळजी घेणारा, भावनिक असणारा आणि मला वेळ देणारा लाइफ पार्टनर हवाय. जसे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा असतात. विराट कोहली किती व्यग्र असतो. पण तरीदेखील अनुष्काबद्दलचं प्रेम नेहमी व्यक्त करतो. मला असा मुलगा हवाय. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात...", असं युजवेंद्र चहल म्हणाला.
शेफाली बग्गा कोण? (Who Is Shefali Bagga?)
शेफाली बग्गा 'बिग बॉस 13'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली. या शोदरम्यान तिचे शहनाज गिलसह अनेक स्पर्धकांशी जिव्हाळ्याचे संबंध दिसलेले. शो संपल्यानंतर ती काही म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली होती, मात्र सध्या ती पुन्हा स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणूनच काम करतेय. तर, युजवेंद्र चहलबाबत बोलायचं झालं तर, 2020 मध्ये युजवेंद्र चहलनं धनश्री वर्मासोबत लग्न केलं. पण, 2025 मध्ये त्यांनी परस्पर संमतीनं घटस्फोट घेतलेला. घटस्फोटानंतर धनश्री शेवटची 'राईज अँड फॉल' या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















