Shashank Ketkar On Live In Relationship: 'होणार सून मी ह्या घरची' (Honaar Soon Mee Hyaa Gharchi), 'मुरांबा' (Muramba) यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला मराठी अभिनेता (Marathi Actor) शशांक केतकर (Shashank Ketkar) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रिय असतो. शशांक केतकर नेहमीच अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर व्यक्त होत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना शशांक केतकर यानं थेट देशातील लग्नसंस्थेबाबत आपलं मत व्यक्त केलं असून लिव्ह-इन रिलेशनशिपवरही भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement

विषय अवघड आहे... कारण फक्त तुम्हाला नवरा-बायको हा टॅग लागला आणि एक दागिना गळ्यात आला म्हणजे सगळ्याची उत्तरं मिळाली, असं होत नाही, असं मत 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना शशांक केतकर यानं मांडलं आहे. तसेच, एक लग्न करून दुसरीकडे लिव्ह-इनमध्ये राहणारीही माणसं आहेत इंडस्ट्रीमध्ये, असा भुवाय उंचावणारा खुलासाही शशांक केतकर यानं केला आहे. 

अभिनेता शशांक केतकर नेमकं काय म्हणाला? (Shashank Ketkar On Live In Relationship)

Continues below advertisement

टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर बोलताना म्हणाला की, "विषय अवघड आहे... कारण फक्त तुम्हाला नवरा-बायको हा टॅग लागला आणि एक दागिना गळ्यात आला म्हणजे सगळ्याची उत्तरं मिळाली, असं होत नाही. किंवा तो दागिना घातला नाही आणि कागदोपत्री तुम्ही नवरा-बायको नाही, म्हणून सगळ्याची उत्तरं मिळाली असंही होत नाही. या नात्यामध्ये नवरा-बायकोच नसतात फक्त किंवा लिव्ह-इनमध्ये राहणारे मुलगा आणि मुलगी, हे दोघंच त्या नात्यात नसतात. त्यांची संस्कृतीही एकत्र येत असते. विषय म्हटलं तर खूप अवघड आहे. कारण, एक लग्न करून दुसरीकडे लिव्ह-इनमध्ये राहणारीही माणसं आहेत इंडस्ट्रीमध्ये. आपल्या या इंडस्ट्रीला ग्लॅमर असल्यामुळे याबद्दल चर्चा होतात..."

"अनेक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात. भारताच्या काही राज्यांमध्ये, तुम्ही लिव्ह-इनमध्ये राहत असाल, तर पोलिसांकडे जाऊन रजिस्टर करणं हे सक्तीचं केलेलं आहे. मी त्या गोष्टीला सपोर्ट करेन. कारण, आपल्याकडे लोकसंख्या इतकी आहे, आपल्याकडे गुन्हे इतके होत असतात, ते पकडल्यानंतर रडण्यात अर्थ नाही. उद्या एका मुलाने 40 मुलींना फसवलं, हे गुन्हे जे नंतर उघडकीस येतात, त्यापेक्षा कुठेतरी अंकुश राहावा यासाठी तुम्ही लग्न करा, लग्नानंतर रजिस्टर करावं लागतं. पण, लिव्ह-इनमध्ये राहत असतानाही रजिस्टर करणं गरजेचं आहे...", असं शशांक केतकर म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sushant Divgikar On Becoming Rani Kohenur: मुलाची मुलगी झाली, 'या' प्रसिद्ध ट्रान्सजेंडर अभिनेत्रीने सहन केले अनेकांचे टोमणे, म्हणाली, 'माझ्या सेक्सुअ‍ॅलिटीशी कुणाचं देणंघेणं...'

ABP Majha च्या बातम्या LIVE