Star Pravah Shashank Ketkar Marathi Serial Off-Air: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या मराठी वाहिन्या टीआरपीसाठी अनेक नवे बदल करताना दिसत आहेत. अलीकडेच स्टार प्रवाहने आठ नव्या कोऱ्या मालिकांची घोषणा केली. 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ' मालिका संपल्यानंतर आता गेल्या 4 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने नुकतेच 1400 भाग पूर्ण केले होते,मात्र आता ही मालिका अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मालिकेच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे. 

Continues below advertisement

कोणती मालिका संपणार?

14 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेली मुरांबा मालिका आता स्टार प्रवाहवरून  प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत शशांक केतकर आणि अभिनेत्री शिवानी मुंडे कर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. खरंतर मालिका सुरू झाली तेव्हापासूनच रमा आणि अक्षयच्या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली होती.दोघांचाही भूमिकांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं.मात्र 14oo भाग पूर्ण झाल्यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.अभिनेत्री शिवानी मुंढेकरने तिच्या सोशल मीडियावर स्टोरी टाकत 'वन लास्ट टाईम ' असे लिहिले आहे.तिने तिच्या रमा या भूमिकेचे शेवटचे काही क्षण चाहत्यांशी शेअर केले आहेत.

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांपासून मुरांबा ही मालिका दुपारच्या वेळेस प्रेक्षकांना पाहता येत होती.दुपारच्या वेळेतील ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका ठरली.पण मधल्या काळात या मालिकेच्या कथानकात मोठा लीप आलेला.या लीप नंतर बदललेल्या कथानकावरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं. दरम्यान, मालिका बंद होत असल्याने अभिनेता शशांक केतकरने ही भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला 'या मालिकेने 1400 भाग पूर्ण केले आहेत.मनामध्ये खूप संमिश्र भावना आहेत.आम्ही एवढा मोठा पल्ला गाठलाय.प्रोडक्शन हाऊस कडून आम्हाला प्रचंड पाठिंबा मिळाला म्हणूनच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत.' असं तो म्हणाला. 'मुरांबा' या मालिकेत शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकरसह सुलेखा तळवळकर, अभिजीत चव्हाण, प्रतिमा कुलकर्णी,मीरा सांग,आरंभी उबाळे,काजल काटे,सिद्धार्थ खिरीड यांच्याही  भूमिका महत्त्वाच्या होत्या. या मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रसारित होईल याबाबत अध्यापक अधिकृत माहिती समोर आलेली नाही.