Sharad Ponkshe : महाराष्ट्राच्या विधनसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Assembly Elections 2024) प्रचाराच्या रणधुमाळीत अनेक कलाकार झळकले होते. काहींनी तर अगदी खणखणीत भाषणं व्यासपीठावरुन उमेदवारांसाठी केलीत. यामध्ये अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांचं नाव विशेष चर्चेत आलं. कारण शरद पोंक्षे हे शिवसेनेत जरी असले तरीही त्यांनी मनसेच्या उमदेवारांसाठी प्रचार केला होता. त्यानंतर शरद पोंक्षे आता रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यांचं पुरुष हे नवं नाटक नुकतच रंगभूमीवर आलंय. या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक खास विनंती केली आहे. 


मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर काहींच्या शपथविधीवर बोलताना शरद पोंक्षेंनी नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुरुष नाटकाचा प्रयोग ठेवण्याची विनंती एबीपी माझाच्या माध्यमातून केली आहे. ज्येष्ठ नाटककार जयवंत दळवी यांचं पुरुष नाटक जवळपास 40 वर्षांनंतर रंगभूमीवर दाखल झालंय. पण या नाटकाचे फक्त 50च प्रयोग होणार आहेत. जयवंत दळवी यांच्या  जन्मशताब्दीच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे. स्त्रीच्या संघर्षाची गाथा आणि समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेवर सडेतोड भाष्य करणारी ही कलाकृती आहे.


शरद पोंक्षेंनी काय म्हटलं?


कला आणि राजकारण कायमच हातात हात घेऊन चालतात,ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, त्यांनाच मंत्रीपदं दिली जात आहेत, अशा बातम्या देखील आहेत. त्यावर शरद पोंक्षेंनी म्हटलं की, त्यासाठीच तुम्ही आमचं नाटक बघायला या. राजकीय क्षेत्रातील लोकांनी तर नक्की या. राजकीय क्षेत्रातील लोकांनी हे नाटक का बघावं? यावर शरद पोंक्षेंनी म्हटलं की, तुमच्यात सुधारणा होण्यासाठी आयुष्यात कुणीतरी आरसा दाखवणारं लागतं तुमच्यात सुधारणा होण्यासाठी. वाल्या कोळीलाही कुणीतरी आरसा दाखवला. तेव्हा त्याला त्याचा चेहरा भयानक दिसला. ते दाखवणारे नारदमुनी होते. त्याला दिसलं की अरे बापरे, मी इतका भयानक आहे आणि त्याने स्वत:ला बदललं. 


शरद पोंक्षेंची देवेंद्र फडणवीसांना खास विनंती


आताच्या राजकारण्यांना आरसा दाखवण्याची गरज आहे, असं वाटतंय का? त्यावर शरद पोंक्षे म्हणाले की, खोट्या आशेवर जगायला काय हरकत आहे. आपण सामान्य माणसं काहीतरी चांगलच होणार, याच आशेवर जगतोय आपण. मग ही आशा आहे माझी, कधीतरी चुकून एक-दोन आमदार आले, मी बोलावणार आहे त्यांना अधिवेशन संपलं की, मी तुमच्या 288 आमदारांसाठी प्रयोग करायला तयार आहे. फडणवीस साहेब नागपुरातलं अधिवेशन संपलं की शेवटच्या दिवशी आमच्या नाटकाचा प्रयोग लावा. म्हणजे सगळ्यांना आरसा दिसेल. त्यातले सगळेच तसेच नाहीत. त्यांनी कोणते संवाद ऐकावेत असं वाटतं, त्यावर शरद पोंक्षे म्हणाले की, त्यासाठी पुरुषवर एक वेगळं अधिवेशन घ्यावं लागेल. 



ही बातमी वाचा : 


Amruta Khanvilkar : टेलिव्हिजन ते ओटीटी, अमृता खानविलकरने 2024 वर्षात केल्या 'या' खास गोष्टी!