Sharad Ponkshe On BJP: भाजपची (BJP) काँग्रेस (Congress) व्हायला लागली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) हिंदुत्व बाळगणाऱ्या दहा भाजप उभा करू शकतो हे लक्षात ठेवावं, असा सूचक इशारा मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) यांनी नागपुरातील (Nagpur News) एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे. आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, आता आम्हीच आहोत..., या अहंकारात ही भाजपनं राहू नये,  असं वक्तव्यही शरद पोंक्षे (Marathi Actor Sharad Ponkshe) यांनी या कार्यक्रमात बोलताना केलंय. 

Continues below advertisement

शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले? (Sharad Ponkshe On BJP And RSS)

राज्य सरकारच्या (Maharashtra News) सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं रविवारी नागपुरात व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मराठी अभिनेते शरद पोंक्षे उपस्थित होते. या कार्यक्रमात 'भारत एक हिंदू राष्ट्र' या विषयावर बोलताना शरद पोंक्षे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची आई आहे, मात्र भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर, अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा सूचक इशारा शरद पोंक्षे यांनी बोलताना दिलाय.

Continues below advertisement

"आज भारतामध्ये हिंदूंचे सण, उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जातायत. 'गवनि म्हणा आम्ही हिंदू आहोत', असं म्हणण्याची ताकद केवळ केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळेच आहे. याचं संपूर्ण श्रेय मोदींसोबत संघाला जातं. शंभर वर्षात अनेक उपेक्षा सहन करूनही संघ आज ताठ उभा आहे. संघ ही भाजपची आई आहे. मात्र, भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं. पुन्हा दहा-पंधरा वर्ष वाट पाहावी लागली तरी चालेल. पण, कट्टर हिंदूच्या दहा भाजप उभ्या करण्याची ताकद संघात आहे...", असं शरद पोंक्षे म्हणालेत.              

"मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाही, ते जाळणाऱ्यांनी वाचली नाही, वाचली असती तर ते जाळूच शकले नसते...", असं यावेळी बोलताना शरद पोंक्षे म्हणाले आहेत. 

दरम्यान, राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीनं आयोजित तीन दिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेत 'भारत एक हिंदू राष्ट्र' या विषयावर पोंक्षे बोलत होते. नागपुरात रेशीमबाग इथल्या महर्षी व्यास सभागृहात व्याख्यानमालेचा कार्यक्रम पार पडला.