Sharad Pawar on Manvat Murder:   महाराष्ट्रातील परभणी (Parbhani) तालुका हा 70च्या दशकात एका हत्याकांडामुळे पुरता हादरुन गेला होता. परभणीमधील मानवत गावात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरुन गेलं होतं. याच हत्याकांडावर आधारित वेब सीरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित करण्यात आली आहे. 'मानवत मर्डर्स' (Manvat Murders) असं या सीरिजचं नाव आहे. जेव्हा ही घटना घडली त्याकाळी शरद पवार हे गृहराज्य मंत्री होते. तत्कालीन गृहराज्य मंत्री म्हणून शरद पवारांनी (Sharad Pawar) या केसमध्ये स्वत: लक्ष घातलं होतं. यावर नुकतीच शरद पवारांचीही प्रतिक्रिया समोर आलेली आहे.


मानवत मर्डर्स या सीरिजचा दिग्दर्शक आशिष बेंडे याने त्याच्या सोशल मीडियावर शरद पवारांची प्रतिक्रिया शेअर केली आहे. आशिषने ही प्रतिक्रिया शेअर करताना म्हटलं की, 1972 साली  जेव्हा मानवत हत्याकांड झालं, तेव्हा तत्कालीन गृहराज्य मंत्री शरद पवार  ह्यांनी DCP रमाकांत कुलकर्णींवर ही केस सोपवली.जवळपास पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या ह्या घटनाक्रमाला उजाळा देत मा. शरद पवारजींनी सुपरकॉप रमाकांत कुलकर्णी आणि या मानवत केसच्या आठवणीं सांगितल्या.


मानवत केस माझ्या सुरुवातीच्या काळातली केस - शरद पवार


शरद पवारांनी या केसवर बोलताना म्हटलं की, 'नंतरच्या काळात मुंबई बॉम्ब ब्लास्ट झाला किंवा लातूरचा भूकंप अशी मोठी मोठी आव्हानं आलीत. पण माझी सुरुवात या मानवत केसमुळे झाली. मानवत केस ही माझ्या सुरुवातीच्या काळातली होती. पोलिसांना या केसमध्ये यश येत नव्हतं. इथली सगळी पोलीस यंत्रणाही डीमॉरलाईज झाली होती. काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला होता. माझ्या हाईयेस्ट लेव्हलला मी एक बैठक घेतली. आम्ही सांगितलं की, राज्यात अत्यंत ऑनेस्ट, कमिटेड आणि कॉम्पिटन्ट जो अधिकारी अशा दोन अधिकाऱ्यांची नावं मला सुचवा.'


पुढे त्यांनी म्हटलं की, 'त्या दोन अधिकाऱ्यांमध्ये रमाकांत कुलकर्णी यांचं नाव होतं. मी त्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं अशी अशी आणि ही ही केस आहे. प्रकरण गंभीर आहे आणि हे एक आव्हान आहे, तुम्ही हे स्वीकारावं. रमाकांत कुलकर्णींनी हे सगळं प्रकरण बाहेर काढलं.' 






ही बातमी वाचा : 


Salman Khan : 'मलाही आज या सेटवर यायाचं नव्हतं पण...', मिळणाऱ्या धमक्यांनंतर भाईजानने बिग बॉसच्या मंचावर व्यक्त केल्या भावना