Shantanu Moghe On Priya Marathe: मराठी चित्रपटसृष्टी (Marathi Industry) तसेच, हिंदी मालिकाविश्वातली (Hindi Serial) लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं 31 ऑगस्ट रोजी निधन झालं. तिला जाऊन आता महिना उलटला आहे. तरीसुद्धा तिचा पती अभिनेता शंतनू मोघे तिच्या जाण्याचं सत्य स्विकारू शकलेला नाही. प्रियाच्या जाण्यानंतर त्यानं काम करायला सुरुवात केली असली, तरीसुद्धा त्याच्या मनातलं दुःख, भावना त्यानं आजवर व्यक्त केल्या नव्हत्या. प्रियाच्या जाण्यानंतर एक महिन्यांनी शंतनूनं सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहीली आहे. तसेच, त्याचे आणि प्रियाचे एकत्र काही फोटो शेअर करुन त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Continues below advertisement


शंतनू मोघेनं सोशल मीडिया पोस्टमध्ये काय लिहिलंय? (Shantanu Moghe Emotional Post For Priya Marathe)


शंतनू मोघेनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शंतनूनं लिहिलंय की, "ही कृतज्ञता व्यक्त करणारी एक अतिशय खास पोस्ट आहे. ज्यांनी ज्यांनी विविध संपर्क माध्यमांचा, जसं की कॉल, ई-मेल, व्हॉट्सअॅप, X (ट्विटर), इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर माध्यमातून, न्युमेरो उनो (खास व्यक्ती) अर्थात प्रिया मराठेबद्दल आपलं प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त केले, त्या सर्वांसाठी हे विशेष आभार! मी त्या सर्व कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींचा, चाहते आणि फॉलोअर्सचा, ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तींचा खूप आभारी आहे, ज्यांनी इतक्या उदारपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या."


पुढे बोलताना शंतनू म्हणाला की, "आज एक महिना पूर्ण झाला. वैयक्तिक दुःख आणि वेदना शब्दांत मांडणं अशक्यच... माझ्या माहितीत असलेल्या इतक्या प्रेमळ, सकारात्मक आणि शुद्ध आत्म्याचा अनपेक्षित, अन्यायकारक आणि दुर्दैवी निरोप झाल्यामुळे आमचं हृदय आजही तुटतंय... पण तिनं असंख्य हृदयांना स्पर्श केलाय आणि तोही कसा... कामातून, कलेतून, प्रेमातून, काळजीनं, वागण्यातून, संवेदनशीलतेतून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सगळ्यांना जोडणाऱ्या तिच्या 'कृती आणि सकारात्मक ऊर्जेनं!"




"प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात आमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या तुम्हा सर्व लोकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. तुम्हा सर्वांसाठी प्रेम आणि शुभेच्छा! मनापासून कृतज्ञता. देवांना माझी चेतावणी: यापुढे तिची काळजी घेण्यात आणि तिच्यावर प्रेम करण्यात तुमच्याकडून एकही चूक झाली, तर ती माफ केली जाणार नाही... माझी परी (Angel)... पुन्हा भेटेपर्यंत खूप प्रेम.", असं शंतनू म्हणाला आहे. 


"तुमचा ओलावा आणि प्रामाणिकपणा, दुःख आणि काळजी आमच्यापर्यंत कोणतीही शंका न ठेवता, 100% पोहोचली. तसेच, जगभरातून आलेल्या असंख्य आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझा माणुसकीवरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला. देव तुमचे भले करो...", असं शंतनू मोघे म्हणाला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mrunmayee Deshpande On Parenthood: मराठी अभिनेत्रीनं पालकत्त्वावर, मुलांच्या संगोपनावर व्यक्त केलं महत्त्वाचं, पण थेट मत; म्हणाली...