Shalin Bhanot : अभिनेता शालिन भनोत (Shalin Bhanot) याला तब्बल 200 विंचूंनी चावा घेतला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र, लोकांकडून सहानुभूती मिळण्याऐवजी उलट त्यालाच दोन शब्द ऐकावे लागत आहेत. शालिन हा सध्या ‘खतरो के खिलाडी’ (Fear Factor: Khatron Ke Khiladi) या रिएल्टी शोमध्ये सहभागी झाला आहे. त्याच्या चित्रीकरणादरम्यानच त्याला विंचू चावले आहेत.
छोट्या पडद्यावर सध्या 'खतरो के खिलाडी' या रिएल्टी शोचा नवा सीझन लोकांच्या भेटीला आला आहे. सध्या या शोचा 14 वा सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये सुमोना चक्रवर्ती, करणवीर मेहरा, अदिती शर्मा, शालीन भानोत, अभिषेक कुमार आदी सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. आता, शालिन भानोतचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शालिनच्या चेहऱ्याला सूज आली आहे. त्याशिवाय अंगावरही चट्टे दिसत आहेत.
शालिन भानोतचा व्हिडीओ अभिषेकने शूट केला असून या व्हिडीओमध्ये बोलतो की, “बघा हे काय झालं?”, त्याला नंतर अभिषेक विचारतो की, “हे कोणी केलं?”, त्यावर शालीन उत्तर देतो की, “मला विंचू चावले”. 'खतरो के खिलाडी'मधील टास्कमध्ये त्याला 200 विंचू चावले.
नेटकऱ्यांनी काय म्हटले?
शालिनच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शालिन काळजी घे असेही एकाने म्हटले. तर, एका युजरने म्हटले की हे सगळं तू स्वत:साठी करतोय, आमच्यासाठी करत नाही. आणखी एकाने म्हटले की, हे सगळं करण्यासाठी तुला पैसे मिळतात, आम्हाला काय याचं असे म्हटले. याचे ओव्हरअॅक्टिंगचे 50 रुपये कापा असे एकाने म्हटले.
बिग बॉसमध्ये झाला होता सहभागी
शालिन भानोत हा सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस'मध्ये (Bigg Boss 16) दिसला होता. शालिन भानोत हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता आहे. 'सात फेरे: सलोनी का सफर', 'कुलवधू', 'गृहस्थी', 'सूर्यपुत्र कर्ण' आणि 'सान्या' सारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. लजीत कौरसोबत 'नच बलिए 4' या डान्स रिअॅलिटी शोमध्येही त्याने भाग घेतला होता.