एक्स्प्लोर

'आईच विष देऊन मारणार होती..'शक्तीमान'फेम अभिनेत्रीचा आणखी एक खळबळजनक खुलासा, म्हणाली...

तिच्या आईने तिला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचं ती म्हणालीय. तिच्या या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. 

Shaktiman fame actress: एका संपूर्ण पिढीसाठी वैष्णवी मॅकडोनाल्ड (Vaishnavi McDonald) म्हणजे ‘गीता विश्वास’.शक्तिमान मधील निर्भीड पत्रकार. 1997 ते 2005 दरम्यान प्रसारित झालेल्या या लोकप्रिय मालिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली. मात्र टीव्हीवर प्रसिद्ध चेहरा बनण्याआधी वैष्णवीने अत्यंत संघर्षमय बालपण, कटू अनुभव आणि मोठ्या संकटांचा सामना केला होता. 

काही दिवसांपूर्वीच 'शक्तीमान' फेम अभिनेत्रीने तिच्या कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला होता. एक अभिनेता रोज संध्याकाळी फोन करून बोलवायचा. 'इथे फक्त पुरुषांची पार्टी आहे, तू ये' असं म्हणायचा. कॉम्प्रमाईज करण्यास नकार दिल्यानंतर चित्रपटातून काढण्यात आल्याचं अभिनेत्री वैष्णवी मॅकडोनल्डने सांगितलं होतं. आता तिनं तिच्या बालपणीचे कटू अनुभव सांगितले आहेत. तिच्या आईने तिला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचं ती म्हणालीय. तिच्या या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. 

वैष्णवी मॅकडोनाल्डचं संघर्षमय आयुष्य 

आई-वडिलांमधील अहंकाराच्या भांडणांचा फटका तिच्या शिक्षणाला बसला. तिने सिद्धार्थ कनन यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “आई-वडिलांच्या भांडणांमुळे आम्ही सतत हॉटेलमध्ये राहत होतो. एका हॉटेलमधून दुसऱ्यात जात राहायचो. मी शाळेत कशी जाणार? मी अभ्यासात खूप हुशार होते; मला वैज्ञानिक व्हायचं होतं.” पण नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं. कुटुंब हैदराबादमध्ये एका छोट्या भाड्याच्या घरात राहायला लागलं आणि आयुष्य थोडं स्थिर होत असतानाच तिचे वडील अचानक बेपत्ता झाले. 

आईने घेतलेला टोकाचा निर्णय

पैशांची तीव्र कमतरता असल्याने वैष्णवीची आई उधार पैसे घेऊन तिला आणि धाकट्या बहिणीला वडिलांच्या शोधात मुंबईत घेऊन आली. त्या एका लॉजमध्ये राहत होत्या. भाडे आणि जेवणासाठीही पैसे नसल्याने आईची मानसिक अवस्था इतकी बिघडली की तिने तिघींनाही संपवण्याचा विचार केला.याचा खुलासा तिने अनेक वर्षांनी केला आहे.वैष्णवीने सांगितले, “माझ्या आईने आत्महत्या करण्याचा आणि आम्हालाही मारण्याचा विचार केला होता. तिने नंतर सांगितलं, ‘मी तुम्हाला विष देऊन मारणार होते.’ तेव्हा मी 16 वर्षांची आणि माझी बहीण 12 वर्षांची होती. आम्ही चुकीच्या हातात पडू नये, अशी तिची भीती होती.” 

दाराबाहेर सापडले पैशांचे बंडल

निराशेच्या शेवटच्या क्षणी आई त्यांना जवळच्या चर्चमध्ये घेऊन गेली. वैष्णवीच्या मते, तिथेच तिचं आयुष्य बदललं. ती म्हणाली, “मला अलौकिक अनुभव आला. देवाची शक्ती जाणवली आणि मी रडू लागले.” लॉजमध्ये परतल्यावर त्यांच्या दरवाज्याबाहेर अगदी नव्या 100 रुपयांच्या नोटांचा गठ्ठा सापडला,बिल भरण्यासाठी जितकी रक्कम हवी होती तितकीच. 

वडिलांनी केलं धर्मांतर 

वडील बेपत्ता झाल्यानंतर दोन वर्षांनी वैष्णवी त्यांना पुन्हा भेटली. त्यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि दुसऱ्या धर्मात धर्मांतरही केलं होतं. अभिनेत्री म्हणाली, “मी त्यांना माफ केलं… त्यांच्या शेवटच्या क्षणी मी त्यांच्यासोबत होते.” 

‘शक्तिमान’ने दिली आयकॉनची ओळख 

चित्रपटसृष्टीतील नकारात्मकतेला कंटाळून वैष्णवीने टीव्हीकडे वळण्याचा निर्णय घेतला जो तिच्या आईला करिअर संपेल अशी भीती वाटत होती. तरीही तिने मुकेश खन्ना यांचा प्रस्ताव स्वीकारला आणि ‘शक्तिमान’ मध्ये गीता विश्वासची भूमिका साकारली. या भूमिकेने तिला 90 च्या दशकातील टेलिव्हिजन आयकॉन बनवले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
Bigg Boss Marathi 6: शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
Dhurandhar 2: धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार
धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Embed widget