Shakti Mohan On Marriage, Motherhood: चाळीशी गाठूनही बॉलिवूड 'ही' प्रसिद्ध कोरिओग्राफर लग्नापासून पळतेय दूर; म्हणाली, 'स्वतःचं मूलंही नकोय...'
Shakti Mohan On Marriage, Motherhood: वयाच्या चाळिशीतही ती लग्न करण्याचा विचार करत नाही आणि तिला स्वतःचं मुलंही नकोय, असे तिनं सांगितलं.

Shakti Mohan On Marriage, Motherhood: रिअॅलिटी शोमधून (Reality Show) प्रसिद्ध होऊन बॉलिवूडमध्ये (Bollywood News) आपला जम बसवलेली सुप्रसिद्ध कोरिओग्राफर (Famous Choreographer) आणि डान्सर (Dancer) शक्ति मोहन (Shakti Mohan) हिचे अनेक फॉलोअर्स आहेत. 'डान्स इंडिया डान्स'च्या दुसऱ्या पर्वाची विजेती ठरल्यानंतर शक्ति मोहन (Dancer Shakti Mohan) प्रसिद्धीझोतात आली. नुकतंच शक्ति मोहननं आपल्या पर्सनल लाईफवर भाष्य केलंय. त्यासोबतच 40 वर्षांच्या शक्ति मोहन आजही सिंगल आहे. आणि नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिनं लग्न आणि स्वतः मूल या विषयांवर भाष्य केलंय. तसेच, या संभाषणादरम्यान शक्तिनं तिला मूल नको असल्याचंही स्पष्ट केलंय.
शक्ती मोहन नुकतीच सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये आलेली. यावेळी दिलेल्या मुलाखतीत बोलताना ती म्हणाली की, "अनेकजण मला लग्नाबद्दल विचारतात. काल मला माझ्या वडिलांनी विचारलं की, तुझ्या आयुष्यात कोणी आहे का? माझ्या आईला वाटतंय की, कमीत कमी माझा बॉयफ्रेंड तरी असावा... पण, मला माझं काम आणि स्टुडिओ चालवण्यात मजा येतेय, मला असं नाही वाटत की, काही कमी आहे... आपल्या आयुष्यात कोणीतरी असणं अत्यावश्यक आहे, ही एक सामाजिक मानसिकता आहे..." दरम्यान, पुढे बोलताना, शक्तिनं आपण 'सिंगल' (अविवाहित) असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय. एवढंच नाहीतर शक्तिनं यादरम्यान, हेसुद्धा म्हटलंय की, तिच्यात मातृत्त्वाची भावना नाहीय आणि तिला कधीच आई व्हावसं वाटलं नाही.
View this post on Instagram
दोन ब्रेकअप, एकाला तर रंगेहाथ पकडलेलं... : शक्ति मोहन (Shakti Mohan On Break Up)
शक्ति मोहननं आपल्या भूतकाळातील प्रेमसंबंधांविषयीही मन मोकळं केलंय. तिनं असं उघड केलंय की, तिचं मन दोनदा दुखावलं गेलं होतं. याशिवाय, तिच्यासोबत विश्वासघातही झाला होता. ती म्हणाली, "एका रिलेशनशिपमध्ये असताना माझ्यासोबत विश्वासघात झालेला. मी ते रिलेशन तात्काळ संपुष्टात आणलं. मात्र, माझ्या आईनं मला समजावलं की, तो एक चांगला माणूस आहे आणि आम्ही तीन वर्ष एकत्र घालवली असल्यामुळे, मी ती गोष्ट विसरून जावी..."
शक्तीनं पुढे असंही सांगितलं की, तिनं आपल्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडलेलं. त्यानंतर त्यानं तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तो रोज तिच्या घरी यायचा, तरीही ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि ती आपल्या भूमिकेवर ठाम होती.
दरम्यान, 'डान्स इंडिया डान्स'च्या दुसऱ्या पर्वाची विजेती ठरलेली शक्ती मोहन आपल्या क्लासी आणि हटके डान्स मूव्ह्समुळे अनेकांचं लक्ष वेधून घेते. डान्स रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफर म्हणून आपला जम बसवला. आज तिची गणना बॉलिवूडच्या बड्या कोरिओग्राफर्समध्ये केली जाते. कोरिओग्राफीबरोबरच ती डान्स रिअॅलिटी शोची परीक्षक म्हणूनही चाहत्यांच्या भेटीला येते. तसेच, तिचा स्वतःचा डान्स स्टुडिओसुद्धा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















