Shakti Kapoor Slams His Fake Death News: बॉलिवूडच्या (Bollywood News) दिग्गज अभिनेत्याचं निधनाचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि एकच खळबळ माजली. अनेकांनी त्या पोस्टखाली बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली. पण, तेवढ्यात ज्या अभिनेत्याच्या निधनाचं वृत्त व्हायरल होत होतं, त्या अभिनेत्यानं स्वतः एक व्हिडीओ शेअर केला आणि आपण जिवंत असल्याचं चाहत्यांना सांगितलं. तर, स्वतःच्याच निधनाच्या खोट्या वृत्तावर संतापही व्यक्त केलाय.
ज्या अभिनेत्याच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालेले, तो अभिनेता म्हणजे, सुपरस्टार अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिचे वडील, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर (Actor Shakti Kapoor). यांच्या निधनाच्या अफवेमुळे सोशल मीडियावर खळबळ माजलेली. 73 वर्षांचे शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांच्या मृत्यूबाबत पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. मात्र, या अफवांमुळे संतप्त झालेल्या शक्ती कपूर यांनी स्वतः समोर येत प्रतिक्रिया दिली आहे.
शक्ती कपूर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपण पूर्णपणे ठणठणीत असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच, खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर त्यांनी जोरदार संताप व्यक्त करत कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. "मी पूर्णपणे ठीक आहे. कृपया चुकीच्या अफवा पसरवू नका...", असं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं आहे.
मृत्यूच्या खोट्या अफवेवर शक्ती कपूर यांची प्रतिक्रिया
सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये शक्ती कपूर यांच्या निधनाचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं. पण, ही अफवा पसरताच स्वतः शक्ती कपूर यांनी तातडीनं प्रतिक्रिया देत स्वतःच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आणि आपण सुखरूप असल्याची माहिती दिली.
"माझ्या मृत्यूची अफवा पूर्णपणे खोटी, लीगल अॅक्शन घेणार..."
व्हिडीओमध्ये शक्ती कपूर म्हणाले की, "सर्वांना नमस्कार, माझ्या मृत्यूची अफवा पूर्णपणे खोटी आहे. मी पूर्णपणे निरोगी आणि आनंदी आहे. कृपया अशा अफवांकडे दुर्लक्ष करा. मी याबाबत तक्रार करणार असून कायदेशीर कारवाईही करणार आहे. हे अजिबात योग्य नाही..."
व्हिडीओमध्ये शक्ती कपूर शांत दिसत असले, तरी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. अशा प्रकारच्या अफवा केवळ सेलिब्रिटींसाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि जवळच्या व्यक्तींसाठीही मानसिक त्रास देणाऱ्या ठरू शकतात, यावर त्यांनी भर दिला.
फेक न्यूज पसरवणाऱ्यांना कारवाईचा इशारा
शक्ती कपूर यांनी स्पष्ट केलंय की, त्यांच्या मृत्यूबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात ते कायदेशीर पावलं उचलणार आहेत. सोशल मीडियाचा वापर अशा निराधार अफवा पसरवण्यासाठी करू नये, विशेषतः एखाद्याच्या मृत्यूसारख्या संवेदनशील विषयांमध्ये तर अजिबातच नाही, असंही त्यांनी सांगितलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
