Shakti Kapoor: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर हे त्यांच्या बहुमुखी अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी रूपेरी पडद्यावर निर्दयी खलनायकापासून ते विनोदी भूमिकेपर्यंत प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपली छाप पाडली. दरम्यान, त्यांच्या कारकि‍र्दीच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी स्वत:ला एक प्रसिद्ध खलनायक म्हणून स्थापित केलं. अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पालकांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पालक त्यांची खलनायकाची भूमिका पाहून कसे थक्क व्हायचे, नेमकी काय प्रतिक्रिया द्यायचे, याबाबत त्यांनी मुलाखतीतून माहिती दिली. त्यांनी पालकांसोबतचा एक जुना किस्सासांगितला. त्यांनी सांगितले की, एका चित्रपटात त्यांना एका मुलीचा दुपट्टा ओढताना पाहून त्यांचे वडील संतापले होते. त्यानंतर थिएटरमधून निघून गेले. तसेच त्यांना फटकारले.

बॉलिवूडमध्ये शक्ती कपूर यांना निगेटिव्ह भूमिका साकारून लोकप्रियता मिळाली होती. परंतु, त्यांच्या पालकांना ते मान्य नव्हते. या घटनेबद्दल बोलताना शक्ती यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "त्यावेळी माझे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते. इन्सानियत के दुश्मन आणखी एक मोठा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा मी माझ्या पालकांना हा चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेलो होतो. माझे आई - वडील दोघेही चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. पण जेव्हा चित्रपट सुरू झाला, तेव्हा माझ्या पहिल्याच दृश्यात मी एका मुलीचा दुपट्टा ओढताना दिसत आहे".

"त्यानंतर माझ्यावडिलांनी लगेच माझ्या आईला उठवून थिएटरमधून निघून जाण्यास सांगितले होते. हा मुलगा आधी बाहेर असा करत होता, आता मोठ्या रूपरे पडद्यावरही मुलींची छेड काढत आहे. बघा हा नेमकं काय करत आहे. मला हा चित्रपट बघायचा नाही", असं म्हणत शक्ती कपूरच्या वडिलांनीथिएटरमधून काढता पाय घेतला", असं शक्ती कपूर म्हणाले. त्यानंतर शक्ती कपूरला त्यांच्या वडिलांनी फटकारले. "त्यांनी मला बोलावून घेतले आणि ओरडले. तू नेमकं कोणत्या प्रकारची पात्र साकारत आहे. आणि बघ मुलींसोबत अशा प्रकारचं काम करत आहेस? त्यांनी मला तेव्हा सांगितले की, चांगल्या लोकांची व्यक्तीरेखा साकारायला हवी. हेमा मालिनी आणि झीनतअमान यांसारख्या नायिकांसोबत काम करवे, तू गुंडांची भूमिका का करतोयस?", असा सवाल शक्ती कपूरच्या वडिलांनी त्यांना विचारला.

तेव्हा शक्ती कपूर यांनी त्यांच्या वडिलांना प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, "मला तुम्ही जन्म दिला आहे. तसेच चेहरा दिला आहे. या चेहऱ्यामुळे मला कुणीही चांगल्या माणसाची किंवा नायकाची भूमिका देणार नाही", असं शक्ती कपूर म्हणाले.