Shaitaan actor Janki Bodiwala: अजय देवगण आणि आर माधवन यांच्या मुख्य भूमिकेतील 'शैतान' चित्रपटात अभिनेत्री जानकी बोडीवालाने तिच्या अभिनयाने सर्वांना थक्क केलं होतं. हा गुजराती हॉरर चित्रपट 'वाश' चा हिंदी रिमेक होता आणि मूळ चित्रपटातही जानकीने ही भूमिका (जान्हवी) साकारली होती. मूळ चित्रपटात तिने ही भूमिका इतकी उत्तम प्रकारे साकारली की निर्मात्यांनी जानकीला रिमेक चित्रपटासाठी देखील कास्ट करायचं ठरवलं होतं. अभिनेत्री जानकी बोडीवालाने शैतान चित्रपटाबाबत बोलताना सांगितले की, दिग्दर्शकाने तिला विचारले होते की ती एका दृश्यासाठी तिच्या कपड्यांमध्ये प्रत्यक्षात लघवी करू शकते का आणि मग तो सीन झाला की नाही याबद्दल जानकीने उघडपणे सांगितले आहे.
चित्रपटात तो लघवीचा सीन कोणता होता?
चित्रपटात एक दृश्य आहे जिथे जान्हवी (जानकीचे पात्र), जी एका तांत्रिकाच्या जादूच्या प्रभावाखावी येते, ती इतकी असहाय्य असते की ती तिच्या कपड्यांमध्ये लघवी करते. या दृश्यासाठी दिग्दर्शक कृष्णदेव याज्ञिक यांनी जानकीला विचारले की या दृश्यासाठी ती खरोखरच तिच्या कपड्यांमध्ये लघवी करू शकते का? जानकीने यावर लगेच सहमती दर्शवली कारण तिच्या मते ही एक अभिनय म्हणून एक अनोखी संधी होती. जानकी बोडीवालाने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत बोलताना चित्रपटातील हा सीन तिच्यासाठी सर्वात खास कसा होता याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.
दिग्दर्शकाला मी खरोखर लघवी करावी असे वाटत होते
तांत्रिकाच्या जादूने ग्रस्त असलेल्या मुलीच्या भूमिकेबद्दल बोलताना जानकी बोडीवाला म्हणाली, "मी गुजराती व्हर्जन केले होते आणि मला तिथेही तोच सीन करायचा होता. जेव्हा आम्ही कार्यशाळा घेत होतो, तेव्हा दिग्दर्शक, जो खरोखरच एक चांगला माणूस आहे. त्याने मला विचारले, तू खरोखर हे करू शकतोस का? हे एक विचित्र दृश्य आहे. याचा मोठा परिणाम होईल. हे जाणून मला खूप आनंद झाला. तेव्ही ती म्हणाली, मला आवडले, एक अभिनेत्री म्हणून मला पडद्यावर हे करण्याची संधी मिळत आहे. असे काहीतरी जे यापूर्वी कोणीही केले नाही. कारण त्याचा खूप मोठा प्रभाव पडेल आणि मी त्याबद्दल खूप आनंदी होते. एक अभिनेत्री असल्याने, मला पडद्यावर ते करण्याची संधी मिळत आहे. असे काहीतरी जे यापूर्वी कोणीही केले नाही, असंही ती पुढे सांगते.
या दृश्यामुळे मी चित्रपट साइन केला
जेव्हा शुटींग सुरू झाले तेव्हा वेगवेगळे आव्हान उभे राहिले ज्यामुळे हे स्पष्ट झाले की जानकी आणि दिग्दर्शक कृष्णदेव जे विचार करत होते ते करणे जवळजवळ अशक्य आहे. जानकीने सांगितले की, या दृश्यामुळेच तिने या चित्रपटाला होकार दिला. हा चित्रपट करण्यामागचे ते पहिले कारण होते. एक अभिनेत्री म्हणून ती याबद्दल उत्साहित होती. "पण नंतर, कलात्मक दृष्टिकोनातून ते अशक्य झाले आणि बरेच रिटेक करावे लागले," जानकी म्हणाली सेटवर हे करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नव्हते. म्हणून आम्हाला दुसरा मार्ग सापडला. चित्रपटातील या दृश्यासाठी नंतर एक सिम्युलेशन वापरण्यात आले जेणेकरून जानकी प्रत्यक्षात लघवी करत असल्याचे भासेल.
जानकीने शैतान चित्रपटाच्या दिग्दर्शकाला एक चांगला माणूस असल्याचं सांगत पुढे म्हणाली की, तिच्या आणि दिग्दर्शकाच्या मते, तो सीन शूट करणे अशक्य वाटत होते. त्या सीनमुळे चित्रपट करण्यास सहमत झाली. कारण ती एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करु इच्छित होती. पण नंतर तो सीन करता आला नाही कारण त्यासाठी अनेक रिटेक घ्यावे लागले असते आणि सेटवर ते व्यावहारिकदृष्ट्या शक्य नव्हते. म्हणून आम्हाला तो करण्याचा एक मार्ग सापडला. मला आनंद झाला की मला खऱ्या आयुष्यात मी करू शकत नाही अशा सर्व गोष्टी करायला मिळाल्या आणि तो सीन अक्षरशः माझा आवडता सीन आहे आणि म्हणूनच मी त्या चित्रपटासाठी होकार दिला होता असंही तिने तिच्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
शैतान चित्रपटात अजय देवगण, आर. माधवन, ज्योतिका आणि जानकी बोडीवाला यांचा दमदार अभिनय आहे. 'शैतान' चित्रपटाचा संपूर्ण ट्विस्ट आणि रंगतदार वळणांनी भरलेला आहे आणि एकदम थरारक आहे. विकास बहल यांनी दिग्दर्शक केलेला हा चित्रपट 8 मार्च 2024 रोजी प्रदर्शित झाला होता.