शाहरुख खानचे सिनेक्षेत्रातील 33 वर्ष : पद्मश्रीपासून ते पार्दो आला कारिएरा पर्यंत, सातही खंडामध्ये गाजलाय SRK
Shahrukh Khan : शाहरुख खान यांचे बेमिसाल ३३ वर्ष : पद्मश्रीपासून ते पार्दो आला कारिएरा पर्यंत, सातही खंडांवर गाजलेले SRK

Shahrukh Khan : भारतीय सिनेसृष्टीतील 'बादशाह' म्हणून ओळखले जाणारे शाहरुख खान यांना आज अभिनय क्षेत्रात पदार्पण करून ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिनयाच्या या प्रवासात त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर आपली छाप सोडली आहे. त्यांची दिलखुलास अदा, ताकदीचा अभिनय आणि साधेपणाने भरलेली व्यक्तिमत्त्व यामुळे शाहरुख खान हे भारतीय चित्रपटसृष्टीचे आंतरराष्ट्रीय चेहरा बनले आहेत.
सातही खंडांवर मिळालेला गौरव हा त्यांचं जागतिक लोकप्रियतेचा स्पष्ट पुरावा आहे. आशिया पासून अफ्रिका, युरोप ते ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेपासून दक्षिण अमेरिकेपर्यंत – SRK ने सर्वत्र आपलं अधिराज्य गाजवलं आहे. आणि विशेष म्हणजे, हे करण्याचे भाग्य लाभलेले ते एकमेव अभिनेते आहेत.
आशिया – पद्मश्री पुरस्कार
२००५ मध्ये भारत सरकारने त्यांना देशातील चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मश्री'प्रदान केला. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या मोलाच्या योगदानासाठी आणि ग्लोबल मनोरंजन क्षेत्रावर त्यांच्या प्रभावासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला.
युरोप – पार्दो आला कारिएरा
शाहरुख यांना लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या अफाट कारकीर्दीसाठी 'पार्दो आला कारिएरा' हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. २०१० मध्ये ते बर्लिन टाउन हॉलच्या गेस्टबुकवर स्वाक्षरी करणारे पहिले भारतीय अभिनेता बनले. तसेच, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कडून सामाजिक कार्यासाठी 'क्रिस्टल अवॉर्ड' आणि लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 'ग्लोबल डायव्हर्सिटी अवॉर्ड' ने गौरवण्यात आले.
उत्तर अमेरिका – क्रिस्टल अवॉर्ड आणि IIFA गौरव
२०११ मध्ये टोरांटो येथे झालेल्या IIFA पुरस्कार सोहळ्यात शाहरुख यांना त्यांच्या "My Name is Khan" या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. या चित्रपटामुळे त्यांना जागतिक स्तरावर अभूतपूर्व प्रशंसा मिळाली.
ऑस्ट्रेलिया – ऑनरेरी डॉक्टरेट, ला ट्रोब विद्यापीठ
शाहरुख खान हे ला ट्रोब युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलिया कडून ऑनरेरी डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीय अभिनेते ठरले. मीर फाउंडेशनच्या माध्यमातून स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी, अॅसिड अटॅक पीडित महिलांसाठी आणि गरजू मुलांसाठी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
आफ्रिका – UNESCO चा पिरामिड कॉन मार्नी पुरस्कार
2011 मध्ये शाहरुख खान यांना युनेस्कोचा प्रतिष्ठित 'पिरामिड कोन मार्नी' पुरस्कार देण्यात आला. शिक्षण आणि आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या दीर्घकालीन कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला.
दक्षिण अमेरिका – ग्लोबल डायव्हर्सिटी अवॉर्ड
2014 मध्ये ब्रिटिश संसदकडून 'ग्लोबल डायव्हर्सिटी अवॉर्ड' देऊन शाहरुख यांना सन्मानित करण्यात आले. विविध संस्कृतींना एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना आणि जागतिक सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
इतर महत्त्वपूर्ण गौरव
शाहरुख खान यांना अमेरिकेच्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीने जगातील सर्वाधिक प्रभावशाली 500 व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे.
फ्रान्स सरकारने देखील त्यांना दोन प्रमुख पुरस्कारांनी गौरवले आहे –
2007 मध्ये ‘ऑर्ड्रे दे आर्त ए दे लेत्र’ (कलेसाठीचा राष्ट्रीय सन्मान)
2014 मध्ये ‘लीजन ऑफ ऑनर’, जो फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या




















