Suhana Khan and Agastya Nanda in Relationship : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्टार्सच्या रिलेशनशिपच्या बातम्या येतच असतात. आता चर्चा आहे की, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत आहे. खरंतर, या चर्चेची सुरुवात ही गेल्या वर्षी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ (The Archies) या चित्रपटापासून सुरू झाली. असेही सांगितले जाते की, अगस्त्यने आधीच त्याच्या कुटुंबियांशी सुहानाची ओळख जोडीदार म्हणून केली आहे.  


अगस्त्यने सुहानाची कुटुंबाशी ओळख करून दिली 






'द आर्चीज' चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, सुहाना खान आणि अगस्त्य नंदा रिलेशनशिपमध्ये आहेत. अगस्त्यने सुहानाची त्याच्या कुटुंबाशीही ओळख करून दिली आहे. सूत्रानुसार, गेल्या वर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने कपूर कुटुंबाने एका पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अगस्त्य नंदाने सुहाना खानची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून दिली होती. 


डेटिंगची सुरुवात कधीपासून झाली?


सुहाना आणि अगस्त्य यांच्यातील प्रेमाची सुरुवात झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटापासून झाली. हा चित्रपट सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्या डेब्यू प्रोजेक्ट असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहाना आणि अगस्त्य सेटवर खूप वेळ एकत्र असायचे. त्यांनी कधीही कोणापासून आपले बॉन्डिंग लपवले नाही. 


अगस्त्याच्या आईने या नात्याला मान्यता दिली 


अगस्त्य आणि सुहाना यांचा अजूनही आपलं नातं अधिकृतपणे करण्याचा विचार नाही. मात्र, प्रॉडक्शन हाऊसमधील बहुतेक लोकांना ऑगस्ट 2020 मध्येच त्यांच्या नात्याबद्दल माहिती मिळाली. अगस्त्य नंदाची आई श्वेता बच्चन यांना सुहाना पसंत आहे तसेच त्यांनी यांच्या नात्याला मान्यता दिली आहे, असेही सूत्रांनी सांगितले. 


केवळ सुहाना खान आणि अगस्त्य नंदाच नाही तर बोनी कपूरची मुलगी खुशी कपूरही झोया अख्तरच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. या चित्रपटात वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Amruta Fadanvis : "आज मैं मूड बना लिया"; अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज