Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी यांनी जोरावर बॉलिवूड, मराठी सिनेमा आणि दाक्षिणात्य सिनेमात देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर एक स्थान निर्माण केलं. त्यांनी साकारलेल्या भूमिका सिनेक्षेत्रात नेहमी चर्चेचा विषय असतात. दरम्यान, सयाजी शिंदे यांनी एका मुलाखतीत 'झुलवा'तील त्यांच्या रोलबाबत एक किस्सा सांगितलाय. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
सयाजी शिंदेंनी सांगितलेला किस्सा नेमका काय?
सयाजी शिंदे म्हणाले, झुलवामधील रोल करताना मी अनेक तृतीयपंथीयांना भेटलो. मी कुर्ल्याला रात्री साडेबारा वाजता एका तृतीयपंथीयाला भेटायला गेलो होतो. तेव्हा तो तृतीयपंथीय मला म्हणाला, तू आमच्या लाईनमध्ये कशाला येतोय, चांगला दिसतोय, लग्न कर..मी त्यांना प्रत्युत्तर देताना म्हणालो अहो मी या लाईनमध्ये येणार नाही. मला फक्त माहिती सांगा... त्याला वाटायचं नाही,..हा कोणी तरी पोरगा खोटं बोलतोय आणि आमच्या लाईनमध्ये येतोय.
सयाजी शिंदेंनी कराड-सांगलीतील पुढाऱ्यांबद्दल काय सांगितलं?
पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, कराडचे आणि सांगलीचे पुढारी मुंबईला यायचे...ते डान्सबारमध्ये जायचे. तेव्हा ओळखीचे कोणीतरी आम्हाला बोलवायचे. तेव्हा मी बघायचो..हा आमदार आहे, हा नगरसेवक आहे.. इथं किती पैसे उधळत आहेत. मस्ती करत आहेत. किती धिंगाणा घालत आहेत. तो धिंगाणा मला दिसतो. आपण बघत असतो ते...
वृक्षप्रेमी सयाजी शिंदे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रिय
दरम्यान, अभिनय क्षेत्र सोडून सयाजी शिंदेंची आणखी ओळख आहे. ते निसर्गप्रेमी म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जातात. निसर्गाबद्दलचं त्यांचं प्रेम संपूर्ण महाराष्ट्रात सर्वश्रूत आहे. कला क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी तीन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निडवणुकीच्यावेळी राजकारणात देखील पाऊल ठेवलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकीत अजित पवारांना यश देखील मिळालेलं पाहायला मिळालं.
काही दिवसांपूर्वी आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज व ओमा फाऊंडेशन यांच्या वतीने दिल्ली येथील कार्यक्रमात ' निर्मला गजानन फाऊंडेशन व सह्याद्री देवराई फाऊंडेशन ला 5 कोटीचा निधी केंद्रीय राज्यमंञी रक्षा खडसे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सयाजी शिंदे उपस्थित होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या