Sayaji Shinde Financial Aid Flood Victims Farmers Marathwada: मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मराठवाड्यात अतिवृष्टी (Heavy Rain In Marathwada) झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कधीकाळी अपुरा पाऊस आणि त्यामुळे नशीबी आलेला दुष्काळ यामुळे मराठवाडा हैराण होता. आता तोच मराठवाडा अतिवृष्टीमुळे बेहाल झाला आहे. मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. पुरामुळे शेतातली सुपिक मातीही वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय. अशातच मराठवाड्याला पुन्हा ताठ मानेनं उभं करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. अशातच आता मराठी अभिनेते सयाजी शिंदे (Marathi Actor Sayaji Shinde) यांनी मराठवाड्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. त्यांच्या 'सखाराम बाइंडर' (Sakharam Binder) या नाटकाच्या 10 प्रयोगांचं मानधन ते महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत. 

Continues below advertisement

'सखाराम बाइंडर' नाटकाचा पहिला प्रयोग नुकताच दिल्लीत पार पडला आणि त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या यशानंतर लगेचच, राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिल्लीतील प्रयोगातून जमा होणारे सर्व उत्पन्न पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून दिले जाईल, अशी माहिती कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांनी यावेळी दिली आहे. तर सयाजी शिंदे हे सुमुख चित्र प्रोडक्शनसाठी सखाराम बाइंडरचे पुढील दहा प्रयोग केवळ १ रुपया मानधन घेऊन करणार आहेत. त्यांची उर्वरित मानधनाची संपूर्ण रक्कमही महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना दिली जाईल, अशी माहितीही देण्यात आली. 

सयाजी शिंदे नेमकं काय म्हणाले? 

अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, "मराठवाडा पावसावाचून मरत होता, आता तो पावसामुळे मरतोय, इतकी अवस्था वाईट आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मला परत मी आयुष्यात नाटक करेन, असं वाटलं नव्हतं. पण तरी हे नाटक करायला घेतलं. हे नाटकं इतरं जिवंत, अनेक कालातीत आणि सुंदर आहे. सुंदर विचारांचं आहे. त्यामुळे हे नाटक करावं, असं मला वाटलं. दिल्लीत शुभारंभाचा हाऊसफुल्ल प्रयोग पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रभर या नाटकाचे प्रयोग होतील. महाराष्ट्रात पूरपरिस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे या शुभारंभाच्या प्रयोगाचा नफा आम्ही पूरग्रस्तांना देणार आहोत. तसेच मी माझं पुढील 10 प्रयोगांचं मानधन पूरग्रस्तांना देणार आहे. महाराष्ट्रातील लोकांना माझं आवाहन आहे की पूरपरिस्थितीतील सर्वांना चांगलं जीवन जगता यावं यासाठी पाठिंबा द्या..."

Continues below advertisement

दरम्यान, मराठीतील प्रसिद्ध नाटककार (Famous Marathi Playwrights) विजय तेंडुलकरांचं (Vijay Tendulkar) 'सखाराम बाइंडर' (Sakharam Binder) हे नाटक म्हणजे, अभिजात कलाकृती. 1972 साली प्रदर्शित झालेल्या  या वास्तववादी नाटकाची जादू आजही पहायला मिळते. यात मराठी मनोरंजनसृष्टीत दिग्गज अभिनेते सजाजी शिंदे आणि नेहा जोशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.