Sayaji Shinde: नागपुरातील (Nagpur News) बेला ग्रामपंचायतीच्या (Bela Gram Panchayat) वृक्षारोपणाच्या (Forest Department) प्रस्तावाला वन विभागाचा (Ministry of Forest) नकार देत जागा राखीव वनक्षेत्राची (Reserved Forest Area) असल्याचं म्हणत अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारलेली. त्यानंतर वृक्षारोपणासाठी परवानगीचं बंधन कशासाठी? असा संतप्त सवाल प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि 'सह्याद्री देवराई फाऊंडेशन' (Sahyadri Devrai Foundation) चे प्रमुख सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी केलेला. अशातच एबीपी माझानं या प्रकरणाची दखल घेत, अप्रत्यक्षरीत्या त्यांची चूक मान्य केली असून वन क्षेत्रावर वृक्षारोपण करता येत नाही, असा कुठलाही नियम नसल्याचं वन अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. 

Continues below advertisement

प्रकरण नेमकं काय? 

नागपूर जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीनं त्यांच्या गावालगत सयाजी शिंदे यांच्या फाउंडेशनसोबत मिळून सह्याद्री देवराईसाठी वन विभागाकडे जागेची मागणी केलेली. मात्र, बेला ग्रामपंचायत आणि सह्याद्री देवराई फाऊंडेशननं मागितलेली जागा देण्यास वन विभागानं नकार दिला. मागितलेली जागा राखीव वनक्षेत्र असल्यानं ती देवराईसाठी देता येऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी वृक्षारोपणाची परवानगी देता येणार नाही, असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, ज्या जागेला वनविभाग राखीव वनक्षेत्र सांगतंय. त्या ठिकाणी कुठलंही झाड नाही, उलट त्या जागेवर काही जणांनी अतिक्रमण करून नियमबाह्य पद्धतीनं शेती सुरू केली असल्याचं सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आरोप केलेला.

Continues below advertisement

ABP माझाच्या बातमीचा IMPACT

'सह्याद्री देवराई फाऊंडेशन' संस्थेनं नागपूरच्या बेला ग्रामपंचायत सोबत मिळून बेला गावालगत देवराई उभारण्यासाठी मागितलेली जागा वनविभाग देत नाही. तिथे राखीव वनक्षेत्र असल्याचा कागदोपत्री दावा करून वनविभाग सयाजी शिंदे यांची अडवणूक करत आहे, असं वास्तव 'एबीपी माझा'नं दाखवलेलं. त्यानंतर आज सयाजी शिंदे यांनी नागपूरात वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा वन क्षेत्रावर वृक्षारोपण करता येत नाही, असा कुठलाही नियम नसल्याचं वन अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. 

सयाजी शिंदे काय म्हणाले? 

वनविभागाच्या या चुकीच्या वागण्यासंदर्भातच आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. आता बेला गावाजवळच्या जागेवर वृक्षारोपण केलं जाईल, त्या ठिकाणी असलेलं अतिक्रमण ही वनविभाग काढेल, असं आश्वासन पण अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सयाजी शिंदे यांनी दिली. आम्ही त्या ठिकाणी अतिरिक्त 25 एकर जागेची ही मागणी करणार आहोत. कोण चूक? कोण योग्य? अशा वादात आम्ही आता पडणार नाही, त्याऐवजी जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याबर लक्ष केंद्रीत करू, असंही सयाजी शिंदे म्हणाले आहेत. विदर्भातही आता अनेक देवराया आम्ही उभ्या करू, पुढील काही काळात शंभर देवराया उभ्या करण्याचा आमचा प्रयत्न असून प्रत्येक देवराईमध्ये किमान 500 प्रजातींचे वृक्ष असावेत, असा आमचा प्रयत्न राहणार असल्याचंही सयाजी शिंदे म्हणाले आहेत. मागील 100 वर्षांत आपण प्रचंड वृक्षतोड करून खूप मोठं नुकसान करून घेतलंय. किमान आत्ताची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आपण वृक्षारोपणा संदर्भात गंभीर होऊ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sayaji Shinde: वृक्ष लागवडीसाठी कायद्याचे बंधन कशाला? वन जमिनीवरील झालेले अतिक्रमण वन विभागाला दिसत नाही का? सयाजी शिंदे यांचा प्रशासनाला उद्विग्न सवाल, म्हणाले...