Marathi Actor : जगभरात गाजत असलेला सोहळा सध्या सोशल मीडियावर (Social Media) एकमेव चर्चेचा विषय ठरत आहे. अंबानींच्या या सोहळ्यासाठी जवळपास बॉलीवूड बंद अशी परिस्थिती होती. पण मराठी कलाकारांची मांदियाळी मात्र दिसली नाही. काही मोजक्याच मराठी कलाकारांचा या सोहळ्यात समावेश होता. त्यातील काही कलाकार निमंत्रित असूनही पोहचले नाहीत, अशा चर्चा आहेत. त्यातच या लग्नावर टीप्पणी करणाऱ्या मराठी कलाकारांच्या (Marathi Celebrities) पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


अभिनेता सौरभ गोखले याने काही दिवसांपूर्वीच अंबानींच्या लग्नावर मार्मिक पोस्ट केली होती. त्यानंतर अभिनेता सौरभ चौघुले याने देखील या लग्नावर मार्मिक पोस्ट केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका मराठी कलाकाराने मार्मिक पोस्ट केली आहे. अंबानींच्या लग्नासाठी आलिशान असे सेट देखील तयार करण्यात आले होते. त्यावरुनच सौरभने पुन्हा एक पोस्ट केली आहे. 


सौरभच्या पोस्टमध्ये काय?


सौरभने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, येत्या गणेशोत्सवाच्या आराशीसाठी नुकत्याच उरकलेल्या लग्नसमारंभातील सेट, कपडे इत्यादी भाड्याने किंवा विकत मिळतील. संपर्क : पेडर रोडला येऊन एक हाक मारा... जय गनेस..!! अंबानींच्या लग्नात वापरण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कपड्यांवरूनही सौरभने ही पोस्ट केली आहे.




सौरभची आधीची पोस्ट काय?


संगीत सोहळ्यात संपूर्ण अंबानी कुटुंबाने एकत्र डान्स केला होता. त्यावरुन सौरभने पोस्ट केली होती. त्यामध्ये त्याने म्हटलं होतं की, आज एका धनाढ्य कुटुंबातील लग्नसमारंभातील कुटुंबीयंचा नृत्याविष्कार पाहून मला माझ्या छोट्य नुमवि शाळेतील स्नेहसंमेलनातील आमचा नाच आठवला. फरक इतकाच आहे की आम्ही विद्यार्थी होतो आणि त्यांना अर्थ विद्या उत्तम येते...! 


अंबानींचा राजेशाही सोहळा


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे शुक्रवार 12 जुलै रोजी लग्नबंधनात अकडले. त्यानंतर शनिवार 13 जुलै रोजी त्यांचा शुभ आशीर्वाद सोहळा पार पडला. या सोहळ्याला शरद पवार, पंतप्रधान मोदी यांसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यानंतर या सोहळ्यातील शेवटचा दिवस आता पार पडणार आहे. मुंबईतील बीकेसीमधील जिओ सेंटर येथे अनंत आणि राधिकाचं रिसेप्शन पार पडणार आहे.                                           


ही बातमी वाचा : 


Anant-Radhika Wedding : अंबानींच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला ऐश्वर्या एकटीच, पण एन्ट्रीलाच अभिनेत्री संतापली? नेमकं काय घडलं?