Satya movie of ram gopal varma : एकदा गुन्हेगारी क्षेत्रात पडलं की शेवटही तसाच होतो. एका गुन्हेगारी सुरु केली की, इच्छा असतानाही त्यातून बाहेर पडता येत नाही. असंच काहीसं चित्र होतं मुंबईतील अंडरवर्ल्डचं...मुंबईतील हे गँगवॉर अनेक सिनेमांमधून दाखवण्यात आलं. मुंबईतील अनेक डॉन आपल्याला सिनेमातून पाहायला मिळाले. मात्र, दिग्दर्शक राम गोपाल यांचा सत्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. आजही हा सिनेमा यूट्यूबवर आवडीने पाहात असतात.
या चित्रपटात मनोज बाजपेयी, शेफाली शाह, उर्मिला मातोंडकर, जेडी चक्रवर्ती यांसारख्या कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती, तर अनुराग कश्यप आणि सौरभ शुक्ला यांनी लेखन केलं होतं. या चित्रपटात परेश रावल, मकरंद देशपांडे, सौरभ शुक्ला यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
या चित्रपटाची कथा सत्या या पात्राभोवती फिरते – जी भूमिका जेडी चक्रवर्ती यांनी साकारली आहे. तो मुंबईच्या गुन्हेगारी जगतात पाऊल टाकतो, जिथे त्याची भेट कुख्यात गँगस्टर भिकू म्हात्रे (मनोज वाजपेयी) याच्याशी होते. या चित्रपटाने गुन्हेगारी विश्वाचं वास्तवदर्शी चित्रण केलं असून, त्याच्या जबरदस्त कथानकामुळे संपूर्ण भारतात प्रेक्षकांना त्याने भुरळ घातली होती.
सत्या गुन्हेगारी क्षेत्रात येतो. मात्र, त्याचवेळी त्याचं विद्या नावाच्या तरुणीवर (उर्मिला मार्तोडकर) प्रेम होतं. तो गुन्हेगारी क्षेत्रात असताना त्या मुलीला सामन्य माणसाप्रमाणे नोकरी करत असल्याच सांगतो. शेवटी त्या मुलीसोबत त्याला दुबईला जायचं असतं. मात्र, पोलीस विद्यासमोरचं त्याचा इन्काऊंटर करतात. मुंबईतील गुन्हेगारी क्षेत्रावर दबदबा निर्माण करणारे सत्या आणि भिखू म्हात्रे यांचा शेवटही तसाच होतो.
'सत्या'मधील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याचं संगीत. या चित्रपटातून विशाल भारद्वाज यांनी संगीतकार म्हणून पदार्पण केलं होतं, आणि गीतकार होते महान कवी गुलजार. चित्रपटातील गाण्यांनी कथानकाला विशेष उंची दिली आणि अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाच्या यशामुळे राम गोपाल वर्मा यांचं नाव रिअॅलिस्टिक दिग्दर्शनात अग्रस्थानी आलं. 'सत्या' ही त्यांची कलाकृती आजही तेवढीच लोकप्रिय आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
हडकुळी आणि रोगट म्हणताच समंथा रुथ प्रभू भडकली; वर्कआऊटचा व्हिडिओ ट्रोलर्सच्या तोंडावर मारला