Satish Rajwade Returns as Inspector in Natak: मराठी रंगभूमीवर सध्या विविध विषयांवर आधारीत नाटक (Theatre play) पाहायला मिळत आहे. अशाच एका नाटकाची सध्या चर्चा सुरू आहे. 'अ परफेक्ट मर्डर' असे नाटकाचे नाव असून, अफाट उत्कटतेने आणि खिळवून ठेवणाऱ्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या क्लासिक कथानकावर आधारित आणि नीरज शिरवईकर लिखित, तसेच विजय केंकरे दिग्दर्शित हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुख्य म्हणजे, या नाटकात प्रेक्षकांचे लाडके अभिनेते सतीश राजवाडे (Satish rajwade) प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  या नाटकातून  सतीश राजवाडे पुन्हा एकदा इन्स्पेक्टर घारगे यांच्या दमदार भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

Continues below advertisement

इन्स्पेक्टर घारगे बनून सतीश राजवाडे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सज्ज (Satish Rajwade Returns as Inspector Gharage in Marathi Play)

सुमारे 350 हून अधिक यशस्वी प्रयोग पूर्ण केले आणि त्यातले सतिश यांनी जवळपास 120 प्रयोगांमध्ये अभिनय सादर केला. या भूमिकेत पुन्हा परतण्याबाबत सतीश राजवाडे यांनी उत्सुकता दर्शवली, या नाटकाबाबत सतीश राजवाडे म्हणाले की, 'अ परफेक्ट मर्डर, या नाटकाच्या माध्यमातून मी तब्बल 19 वर्षांनंतर पुन्हा मराठी रंगभूमीवर परतलो होतो. या भूमिकेसाठी मला त्या वर्षी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे सर्व पुरस्कार मिळाले होते. हा असा एक पात्राचा प्रवास आहे, जो माझ्या मनाशी कायमचा जोडला गेलाय'.

'पुन्हा त्याच युनिटसोबत आणि त्याच भूमिकेत परतणं हा एक अद्भूत आणि भावनिक अनुभव आहे. या प्रवासात प्रिया आमची अत्यंत जवळची मैत्रीण आणि सहकलाकार होती. तिची उणीव आम्हाला कायम जाणवेल', अशी भावना सतिश राजवाडे यांनी व्यक्त केली. आपल्या कमबॅकबाबत सतिश राजवाडे म्हणाले की,  'आपल्याप्रति लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. पण हेच चॅलेंज एका अभिनेत्याला अधिक सतर्क ठेवतं. भूमिकेची लांबी किती आहे यापेक्षा ती पडद्यावर किंवा मंचावर किती प्रभाव पाडते, हे महत्त्वाचे असते. इन्स्पेक्टर घारगेची भूमिका मला तो प्रभाव पाडण्याची उत्तम संधी देते. थिएटर हे प्रेक्षकांच्या थेट प्रतिसादाचे माध्यम असल्यामुळे मिळणारी तात्काळ ऊर्जा हा एक वेगळाच आनंद असतो', असं राजवाडे म्हणाले.

Continues below advertisement

अ परफेक्ट मर्डर' प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, 'बदाम राजा प्रोडक्शन'च्या माध्यमातून पुन्हा एकदा हा थरार अनुभवायला मिळणार आहे. थ्रिल, रहस्य आणि अभिनयाचा जबरदस्त संगम असलेला हा अनुभव प्रेक्षकांसाठी नक्कीच संस्मरणीय ठरणार, यात शंका नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...