Sara Ali Khan Weight Loss : अभिनेत्री सारा अली खान म्हणजे सैफ अली खानची मुलगी मात्र, तिने बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जर तुम्ही तिला सिनेक्षेत्रातील कारकीर्द सुरु होण्यापूर्वी पाहिलं असेल तर ओळखणं कठीण झालं असतं की ही तीच सारा आहे का? तिच्या ट्रान्सफॉर्मेशनने सगळेच थक्क झालेले पाहायला मिळाले होते. सारा अली खानचं वजन पूर्वी 96 किलो होतं. मात्र, तिने मोठी मेहनत घेऊन वजन घटवलं आणि 47 किलोंवर आणलं. कोणत्याही व्यक्तीसाठी 49 किलो वजन कमी करणं हे सोपं काम नाही. यासाठी साराने प्रचंड मेहनत घेतली आहे. अनेक मुलाखतींमध्ये तिने तिच्या वेट लॉस करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीवर भाष्य केलं होतं. 

Continues below advertisement

“मी ओव्हरवेट नव्हते, मी तर वजन मापण्याचं स्केलच फोडलं होतं”

रणवीर इलाहाबादियाला दिलेल्या एका मुलाखतीत सराने सांगितलं की, "मी ओव्हरवेट नव्हते, मी तर स्केलच फोडलं होतं." अनेकदा असं होतं की जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि वजन मोजता, तेव्हा ते 85 किलो असतं – जे फिटनेसच्या दृष्टीने चांगलं नाही. हे वजन 85 ते 96 किलोपर्यंतही पोहोचत होतं.

वजन कसं केलं कमी?

साराने सांगितलं की, फक्त शरीरावरच नाही तर मेंदूवरही फॅटचा परिणाम होतो. त्यामुळे तिने आपल्या खाण्याच्या सवयींबाबत खूप काटेकोर नियम पाळले. तिने एक संतुलित जीवनशैली स्वीकारली आणि त्याद्वारे तिने स्वतःला फिट ठेवायला सुरुवात केली. डाएटसोबतच तिने वर्कआउटही सुरू केलं, ज्यामुळे तिला आजची ही फिट बॉडी मिळवता आली. 

Continues below advertisement

डाएटमध्ये काय होतं?

वजन कमी करण्यासाठी सारा अली खानने आपल्या डाएटमध्ये लो-कार्ब्स आणि हाय-प्रोटीन अन्नपदार्थांचा समावेश केला. ती दिवसातून फक्त एकदाच कार्बोहायड्रेट घेत असे. त्याशिवाय ती फळं, कोथिंबीर-जीर्‍याचं पाणी आणि भाज्यांचे रस घेत असे. डाएटसोबतच सारा कार्डिओ, वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, पिलेट्स, आणि मेडिटेशनही करत असे. या सगळ्यामुळे तिला 49 किलो वजन कमी करण्यात यश आलं. आजही ती आपली जीवनशैली संतुलित ठेवते जेणेकरून ती नेहमीच फिट राहू शकेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

रिंकू राजगुरु 20 वर्षांनी वारीला निघाली, तल्लीन होऊन भक्तीरसात रमली, इंग्रजीत पोस्ट करत म्हणाली..VIDEO