Sara Ali Khan Entry Banned Without Affidavit In Kedarnath Temple: बॉलिवूडची (Bollywood News) चुलबुली आणि मस्तीखोर अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan). अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी असलेली सारा आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. सारा किती धार्मिक आहे, हे आपण अनेकदा पाहिलंय. दर्गा असो वा मंदिर सारा नेहमीच भक्तीभावात तल्लीन झालेलं पाहायला मिळतं. अनेकदा सारा केदारनाथ (Kedarnath Temple) यात्रेला गेल्याचंही आपण पाहिलंय. सारा केवळ केदारनाथ धामपुरतीच मर्यादित न राहता, विविध मंदिरांना वारंवार भेटी देत असते. अनेकदा ती हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यामुळे तिच्या अध्यात्मिक प्रवासाची झलक पाहायला मिळते. विशेषतः केदारनाथचा उल्लेख करायचा झाल्यास, या पवित्र तीर्थक्षेत्राशी अभिनेत्रीचं एक अद्वितीय आणि सखोल नातं जोडलेलं आहे, ती दरवर्षी किमान एकदा तरी या केदारनाथ धामला भेट देते. पण, आता सारासाठी तीर्थयात्रा करणं तितकंसं सोपं राहिलेलं नाही. कारण, आता साराच्या केदारनाथला जाण्यावरुन काहीसा वाद निर्माण झाला आहे. 

Continues below advertisement

साराच्या केदारनाथ दर्शनावर बंदी (Sara Have To Fulfilled Conditions To Visit  Kedarnath)

सारा अली खानसाठी, दरवर्षी ज्या सहजतेनं आणि उत्स्फूर्तपणे ती केदारनाथ धामला भेट द्यायची, तसं करणं आता तिच्यासाठी वाटतं तेवढं सोपं राहिलेलं नाही. त्यातूनही जर साराला केदारनाथ धामचं दर्शन घ्यायचं असेलच, तर आता तिला एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे. साराला आता ती 'सनातनी' (Sanatani) असल्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. हा केवळ आमचा दावा नसून, तो मंदिर समितीनं घेतलेला एक निर्णय आहे. किंबहुना, बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीनं (BKTC) अलिकडेच या संदर्भात एक आदेश जारी केला आहे. 17 मार्च रोजी 'चार धाम यात्रे'च्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत, मंदिरामध्ये सनातनधर्मीय नसलेल्या व्यक्तींच्या प्रवेशास मनाई करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

साराला द्यावं लागणार प्रतिज्ञापत्र (Sara Will Have To Submit Affidavit) 

बीकेटीसीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, गैर-हिंदूंना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. जो कोणी सनातन धर्मावर विश्वास ठेवतो, तो सनातनी आहे. त्यांनी पुढे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा उल्लेख केला आणि सांगितलं की, तिला प्रवेश मिळण्यापूर्वी मंदिरात तिच्या सनातनी श्रद्धेबद्दल तिला एक प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल. ते म्हणाले की, "जर सारा अली खाननंही सनातन धर्मावर श्रद्धा आणि भक्ती असल्याचं जाहीर केलं आणि आम्हाला प्रतिज्ञापत्र दिलं, तर आम्ही तिला भेट देण्याची परवानगी देऊ..."

दरम्यान, सारा अली खानचा 2016 मधील पदार्पणाचा 'केदारनाथ'  सिनेमा, केदारनाथ धामलाच चित्रित झाला होता.  'केदारनाथ' सिनेमात सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकलेले.  या सिनेमाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले होते. तेव्हापासून, ही अभिनेत्री दरवर्षी मंदिराला भेट देऊन भगवान शिवाचं दर्शन घेते. तिनं असा नियम केलेला की, प्रत्येक वर्षी केदारनाथला भेट देऊन बाबांचं दर्शन घ्यायचं. दरम्यान, आता तिच्यावर घालण्यात आलेला प्रतिबंध आणि अटी याबाबत सारा अली खान काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aastad Kale On Audience: '...तुम्ही इथे येऊन आमचं नाटक करा'; नाटक सुरू असताना फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकावर भडकला आस्ताद काळे, थेट प्रयोगच थांबवला