Sara Ali Khan Birthday Special: 'केदारनाथ' (Kedarnath Movie), 'लव्ह आज कल 2' (Love Aaj Kal 2), 'सिम्बा' (Simba), 'स्काय फोर्स' (Sky Force) यांसारख्या अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये आपल्या अभिनयानं चार चाँद लावणारी अभिनेत्री म्हणजे, सारा अली खान (Sara Ali Khan). पतौडी खानदानाची लाडकी, आज तिचा वाढदिवस आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंह आणि सैफ अली खानची मुलगी असलेल्या सारा अली खाननं तिच्या अभिनय कौशल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये एक स्थान निर्माण केलं आहे. आपला साधेपणा आणि मस्तीखोरपणासाठी सारा अली खान ओळखली जाते. सारानं फारच कमी वेळात मोठी फॅन फॉलोविंग मिळाली आहे. सारा अली खानचं तिची सावत्र आई करिना कपूर खानसोबतही घट्ट नातं आहे. दोघींमध्ये मैत्री आहे, जी अनेकदा चर्चेत असते. सारा अली खाननं कोलंबिया विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्रात पदवी घेतली आहे.
'केदारनाथ' चित्रपटातून सारा अली खाननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं
सारा अली खाननं 2018 मध्ये 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत होता. यानंतर, सारा अली खाननं 'सिंबा', 'अतरंगी रे', 'जरा हटके जरा बच्चे', 'गॅसलाइट', 'स्काय फोर्स' तसेच अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'मेट्रो... इन दिनो' सारख्या चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयानं आपली छाप सोडली.
रोहित शेट्टीनं केलेलं सारा अली खानच्या साधेपणाचं कौतुक
अमृता सिंह आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान अत्यंत साधंसुधं आयुष्य जगते. याबाबत दिग्दर्शक रोहित शेट्टीनं कपिल शर्माच्या शोमध्ये बोलताना सारा अली खानचं कौतुक केलं होतं. त्यांनी सांगितलं की, सारा अली खान रोहित शेट्टीच्या ऑफिसमध्ये गेली आणि हात जोडून त्याच्याकडे काम मागायला लागली. साराच्या साधेपणाचं कौतुक करताना रोहित शेट्टी म्हणालेला की, "सारा खूप मेहनती आणि साधी आहे. आता सारा अभिनेत्री झाली आहे, त्यामुळे मी ती गोष्ट तुम्हा सर्वांसोबत शेअर करू शकतो..."
सारानं हात जोडून दिग्दर्शकाकडे काम मागितलेलं...
दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाला की, "जेव्हा सारा माझ्या ऑफिसमध्ये येणार होती, तेव्हा मला वाटलेलं की, ती सैफ-अमृताची मुलगी आणि पतौडी घराण्याची राजकुमारी असल्यानं तिच्यासोबत नक्कीच 4-5 बॉडीगार्ड असतील. पण, कदाचितच तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ती एकटी आली होती आणि तिच्यासोबत एकही बॉडीगार्ड नव्हता. जेव्हा सारा माझ्याकडे आली तेव्हा तिनं लगेच हात जोडून म्हटलं की, "सर, कृपया मला काम द्या..."
मुस्लिम असूनही महादेवावर निस्सिम भक्ती...
सारा अली खान सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा बळी ठरली आहे. तिची भगवान शंकरावर मोठी श्रद्धा आहे. तिच्या श्रद्धेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करुन तिला सोशल मीडियावर घेरण्यात आलं आहे. तरीसुद्धा सारा अली खान तिच्या श्रद्धेवर ठाम आहे. एका मुलाखतीत बोलताना सारा अली खान म्हणालेली की, "मी जशी आहे तशीच राहते... माझी स्टाईल किंवा वागणं अजिबात कृत्रिम नाही..." पुढे बोलताना तिनं असंही सांगितलं की, "मी महादेवाची भक्त आहे, माझा त्यांच्यावर विश्वास आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :