Santosh Juvekar on Tapovan Tree Cutting: नाशिकमध्ये 2017 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Nashik Kumbhamela 2027) पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापलंय. साधुसंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाचा अनेक पर्यावरणप्रेमी, नागरिक, स्थानिक संघटना तसेच अनेक सेलिब्रिटींनी जोरदार विरोध केलाय. या वृक्षतोडीचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आज (6 डिसेंबर ) तपोवनातील कमानीजवळ निषेध आंदोलन सुरु आहे.  अभिनेते सयाजी शिंदे यांनी विरोध दर्शवल्यानंतर आता अभिनेता संतोष जुवेकरनेही  (Santosh Juvekar) हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हणत रोखठोक भूमिका घेतली आहे. "नका करू तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आहे ती जागा राहू द्या. मला शक्य झाले तर मी सरकारची भेट घेईन. पण तुम्ही दुवा आहात. सरकारकडे आमची भूमिका मांडा असं म्हणत अभिनेता संतोष जुवेकर तपोवनातील झाडांसाठी मैदानात उतरलाय. 

Continues below advertisement

Santosh Juvekar on Tree Cutting:काय म्हणाला संतोष जुवेकर?

तपोवनात होणाऱ्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन येथे चित्रपटसेना आता रस्त्यावर उतरली आहे. तपोवन च्या वृक्षतोडी विरोधात मनसेच्या चित्रपट सेनेकडून आंदोलन छेडण्यात आले आहे. अभिनेता संतोष जुवेकर  या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय. या आंदोलनाला मनसेचे स्थानिक नेते पदाधिकारी उपस्थित आहेत . तपोवन वृक्षतोडीवरून अभिनेता संतोष जुवेकर याने आपली भूमिका मांडली आहे. तो म्हणाला, " आता या क्षणी लोकांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. नका करू. हात जोडून विनंती आहे. आपण झाडं तोडणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे असं मला वाटतंय. असं नका करू. आहे ती जागा राहू द्या. मला शक्य झाले तर मी सरकारची भेट घेईन. पण तुम्ही दुवा आहात. सरकारकडे आमची भूमिका मांडा"  या प्रकारावर अभिनेते दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. (Nashik Tapovan Tree Cutting)

Mahesh Manjrekar on Tapovan Tree Cutting:काय म्हणाले महेश मांजरेकर?

तपोवनातील 1800 झाडांच्या कत्तलीवरून प्रकारावर महेश मांजरेकर म्हणाले," एखादं घरचं माणूस गेल्यावर जेवढं दुःख होतं तेवढं दुःख ही झाडं तोडल्याचं आहे. कुठल्याही कामासाठी झाड तोडू नये.गरज असेल तिथे पर्यायी मार्ग निवडावा पण झाड कृपया तोडू नका.ग्लोबल वॉर्मिंगचा कारणच ते आहे झाडं तोडणे. खरंच दुसरा काहीतरी मार्ग निवडा पण झाड तोडू नका" अशी प्रतिक्रिया चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी दिली.

Continues below advertisement

तपोवनमध्ये नेमकं काय घडतंय?

नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) तयारीला जोरदार सुरुवात झाली असली, तरी तपोवन (Tapovan) परिसरातील प्रस्तावित साधूग्राम (Sadhugram) प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड (Tree Cutting) होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाचा नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना, सेलिब्रिटींसह राजकीय पक्षांनी जोरदार विरोध केला आहे.