Sanskruti Balgude Sambhavami Yuge Yuge Drama: संस्कृती बालगुडेच्या कृष्ण रूपाच रहस्य समोर; चाहत्यांना गूड न्यूज देत म्हणाली...
Sanskruti Balgude Sambhavami Yuge Yuge Drama: कायम सोशल मीडियावर सक्रिय असणारी संस्कृती बालगुडे तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असताना आता ती अजून एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sanskruti Balgude Sambhavami Yuge Yuge Drama: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर श्री कृष्णाच्या रुपातील मनमोहक फोटो टाकून अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने प्रेक्षकांना मोहीत केलेलं, पण हा लूक नक्की कशासाठी होता? याचं उत्तर आज संस्कृतीनं प्रेक्षकांना दिलं आहे.
कायम सोशल मीडियावर सक्रिय असणारी संस्कृती बालगुडे तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असताना आता ती अजून एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फॅशन कॉन्सेप्ट फोटोशूट आणि अभिनय यांच्या सोबतीने उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना असलेली संस्कृती लवकरच एका डान्स ड्रामा मधून प्रेक्षकांना मोहित करणार आहे.
आजवर संस्कृतीने अनेक मुलाखती मधून तिच आणि श्री कृष्णाच असलेलं नातं या बद्दल भाष्य केलं असून आता संस्कृती एक कमाल नवीन डान्स ड्रामा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संस्कृती ने सोशल मीडिया वर पोस्ट करून ही खास गिफ्ट तिच्या फॅन्सला दिलं आहे.
संस्कृतीच्या नव्या प्रोजेक्टच नाव खूप लक्षवेधी असून 'संभवामि युगे युगे' या नृत्य ड्रामा मधून काय अनुभूती प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या बद्दल बोलताना संस्कृती सांगते " मला समजेल्या कृष्णा बद्दल मला एक छान काहीतरी करावं असं वाटतं असताना गेले वर्षभर ही संकल्पना माझ्या मनात होती आणि मुळात मी या संपूर्ण ड्रामासाठी स्वतः हा नृत्य दिग्दर्शन केलं आहे.या शो मधून मला उमजलेल्या कृष्णा बद्दलची गोष्ट त्याचा आयुष्यात घडलेल्या घटना या कृष्ण रुपी पद्धतीने मांडायचा होत्या आणि त्या भरतनाट्यम नृत्य सादरीकरणातून मांडता येणार आहेत याचा खूप आनंद आहे. मुळात मला फक्त इव्हेंटच्या निमित्तानं भरतनाट्यम करण्याची संधी मिळायची पण माझ्या आवडत्या डान्स फॉर्म मधून हा संपूर्ण शो करण्याची संधी या निमित्तानं मला मिळतेय"
'संभवामि युगे युगे' हा नवा कोरा प्रोजेक्ट नक्कीच प्रेक्षकांना मोहित करून जाणार यात शंका नाही. सोबतीला येणाऱ्या काळात ती नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्सचा भाग होताना दिसणार असल्याचं कळतंय.


















