Sanju Samson Close Friend Tovino Thomas: क्रिकेट (Cricket News) आणि सिनेसृष्टी (Movies) यांच्यातील नातं खूप जुनं आहे. अलिकडच्या काळात क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या (Bollywood Actress) प्रेमप्रकरणांच्या बातम्या सर्वाधिक चर्चेत राहिल्यात. पण, तुम्ही कधी क्रिकेट आणि सिनेसृष्टीतल्या मैत्रीचे किस्से ऐकलेत का? मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता, टोविनो थॉमस (Tovino Thomas) यानं केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. त्यानं उघड केलंय की, टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू आणि सध्या आयपीएल गाजवणारा चेन्नईचा धुरंधर संजू सॅमसन हा त्याचा सर्वात जवळचा मित्र आहे.
टोविनो थॉमसनं सांगितलं की, संजूच्या यशाकडे पाहताना त्याला केवळ आनंदच होत नाही, तर त्यामागे एक वैयक्तिक भावनाही दडलेली असते. कारण हे दोघे अनेक वर्षांपासूनचे जवळचे मित्र आहेत आणि ते एकाच राज्याचे रहिवासी आहेत.
संजूचा सामना पाहण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार (Sanju Samson Tovino Thomas Are Close Friends)
संजूसोबतच्या त्याच्या मैत्रीचा किस्सा सांगताना संजू सॅमसननं सांगितलं की, "वर्ल्डकपवेळी तो आपल्या मित्रांसोबत 'Ford v Ferrari' (F1) हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेलेला. पण, त्याचवेळी संजू सॅमसन खेळत असलेला एक महत्त्वाचा सामना सुरू होता. तो सामना मला कोणत्याही परिस्थितीत चुकवायचा नव्हता..." पुढे बोलताना त्यानं सांगितलं की, "मी सिनेमा पाहण्यासाठी गेलेलो, पण माझं संपूर्ण लक्ष माझ्या मोबाईल फोनवर सुरू असलेल्या सामन्यावरच होतं. ती वेस्ट इंडिजविरुद्धचा एक 'नॉकआउट' मॅच होता. मॅच संपेपर्यंत मी सिनेमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, अगदी समोर ब्रॅड पिटसारखा दिग्गज अभिनेता समोर असूनही..." टोविनोनं यावर जोर देऊन सांगितलं की, संजूचं यश त्याला अत्यंत विशेष वाटतं. त्यानं पुढे सांगितलं की, "संजूचं प्रत्येक यश मला असीम आनंद देतं, कारण तो केवळ एक क्रिकेटपटूच नाही, तर माझा एक अत्यंत जवळचा मित्रही आहे..."
उशिरापर्यंत गप्पा-गोष्टी
टोविनो थॉमसनं सांगितलं की, संजूसोबतची त्याची मैत्री एवढी घट्ट आहे की, आम्ही कधीही एकमेकांना फोन करतो. रात्री उशीरापर्यंत भेटतो, गप्पा-गोष्टी करतो. त्यानं सांगितलं की, संजू सॅमसननं रात्री 11 वाजता टोविनोला फोन केला आणि त्यांना भेटायला त्यांच्या शुटिंग लोकेशनवर पोहोचला. टोविनोनं सांगितलं की, यानंतर दोघांनी रात्री दोन वाजेपर्यंत एकत्र वेळ घालवला आणि खूप गप्पा मारल्या.
टोविनो थॉमसच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, टोविनो थॉमस हा एक प्रसिद्ध मल्याळम अभिनेता आहे. त्याच्या '2018' या ब्लॉकबस्टर सिनेमानं जगभरात 176 कोटींची कमाई केली. दरम्यान, 'A.R.M.' या सिनेमानं जगभरात 106 कोटींची कमाई करतेय, 100 कोटींच्या क्लबमध्ये त्याची पहिली 'सोलो' एन्ट्री नोंदवली आहे. याव्यतिरिक्त, 'Thallumaala' या सिनेमानं 47 कोटींची कमाई केलीय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
