Sanju Rathod on Majha Maha Katta : "मी दहावीला असताना मला एक मुलगी आवडायची. तिने मला एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये तिने शायरी वगैरे लिहिली होती. ती खूप विनोदी होती. "चावल का पाणी आँगन मे फेका, मैने मेरे संजू को स्कूल मे देखा", अशी ती शायरी होती. तेव्हापासून मी दोन-चार ओळी लिहायला लागलो. तेव्हा मला एवढं कळायचं नाही. मी तेवढा परिपक्व नव्हतो. तेव्हा केवळ 16 वर्षांचा होतो. मी तिच्या शायरीला उत्तर दिलं की 'फुलं है गुलाब का उसे सुखा मत देना, लडका हूं गरिब का मुझे धोका मत देना," असं गुलाबी साडी (Gulabi Sadi) या गाण्याचा लेखक आणि गायक संजू राठोड (Sanju Rathod) म्हणाला. एबीपी माझाच्या महाकट्ट्यावर (Majha Maha Katta) तो बोलत होता. यावेळी त्याने  लिखाणाला पहिल्यांदा सुरुवात केली, याबाबतचा किस्सा उलगडून सांगितला. 


बाबा वेल्डिंग काम करतात, असंही नाही की ते खूप पैसे कमवायचे


संजू राठोड म्हणाला, लहानपणापासून मी मस्तीखोर आहे. मला वाटायचं दहावीनंतर मी फक्त 2 ते 3 वर्ष घेणार आहे. तेव्हा मी शेतात कामं पण करायचो. म्हशी वगैरे घेणार होतो. त्यानंतर दुध वगैरेचा व्यवसाय करणार होतो. दहावीत प्रेम केलं, तेव्हा माझा मित्र चिठ्ठी पोहोच करायचा, नंतर त्यालाच ती एंगेज झाली. नंतर तिच्या बेस्ट फ्रेंडची चिठ्ठी मला आली. सुरुवातीला मी रॅप लिहित होतो. मी विनोदाने या फिल्डमध्ये आलो, पण या फिल्डमध्ये आल्यानंतर मला समजलं की, स्ट्रगल काय असतो. नातेवाईक काय असतात. फिल्डमध्ये यायच्या अगोदर वडिलांना सांगायचो पैसे पाहिजे, वडिल द्यायचे. माझे बाबा वेल्डिंग काम करतात, असंही नाही की ते खूप पैसे कमवायचे. तेव्हा मी फार परिपक्व नव्हतो. पप्पांना म्हणायचो, मला पैसे पाहिजेत, नाही दिले तर मग रडायचो. नाहीतर मग रुसून बसायचो. घरचे थोडे हळवे असतात, आपल्यासाठी काम करतात, असंही संजू राठोडने सांगितलं. 


मला सुरुवातीला वाटलं की, मी दहावीनंतर मस्त म्हशीवैगरे घेईन


पुढे बोलताना संजू राठोड म्हणाला, मला सुरुवातीला वाटलं की, मी दहावीनंतर मस्त म्हशीवैगरे घेईन, शेती करेन, दुधाचा व्यवसाय करेन असं ठरवलं. मी अत्यंत मजेत या क्षेत्रात आलो. पण तेव्हा कळलं की कष्ट काय असतात, नातेवाईक काय असतात. मी इंजिनिअरिंग करत होतो. अशी वेळ आली की, मी घरुन खूप पैसे घेतले होते. म्हणजे एक वेळ अशी आली की, मी मागे वळू शकत नव्हतो.





इतर महत्वाच्या बातम्या 


Arshad Warsi :  दादा कोंडकेंचा फॅन अर्शद वारसी बॉलिवूडमध्ये कसा आला? 'माझा महाकट्टा'वर 'सर्किट'ची कहाणी