Sanjay Mishra Ghashiram Kotwal Theatre Play: ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर (Veteran Playwright Vijay Tendulkar) लिखित 'घाशीराम कोतवाल' (Ghashiram Kotwal) हे मराठी नाटक आता हिंदीत रंगभूमीवर येत आहे. भारतीय  रंगभूमीवरचं अत्यंत  महत्त्वाचं नाटक असलेल्या 'घाशीराम कोतवाल'चा पहिला प्रयोग होऊन 52 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे नाटक आजवर सुमारे दहा भारतीय भाषांमधून आणि जगातील तीन भाषांमध्ये सादर झाले आहे. मात्र, हिंदीत हे नाटक व्यावसायिकदृष्ट्या सादर केले गेले नाही. त्यामुळे अभिजात कलाकृतीचं हे कालातीत नाटक हिंदी भाषकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदी रंगभूमीवरही सादर करण्याचा निर्णय घेत लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी या हिंदी नाटकाचे शिवधनुष्य पेलले आहे. तसेच, या नाटकात बॉलिवूड अॅक्टर (Bollywood Actor) संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि संतोष जुवेकर (Santosh Juvekar) मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. 

Continues below advertisement


एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर 'घाशीराम कोतवाल' नाटकची टीम आली होती. बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा आणि संतोष जुवेकर आणि लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित होते. त्यावेळी गप्पा मारत असताना संजय मिश्रा यांनी राज ठाकरेंसोबतचा एक किस्सा सांगितला. 


संजय मिश्रा यांना विचारण्यात आलं की, ज्यावेळी अभिजीत पानसे तुम्हाला भेटायला आले, त्यावेळी तु्म्हाला माहीत होतं का? ते मनसे नावाच्या एका राजकीय पक्षाशी जोडलेले आहेत? आणि मराठी नाही बोललं तर ते लोक खळखट्ट्याक करतात...


संजय मिश्रा यांनी बोलताना सांगितलं की, "त्याचा हा बिझनेस मला नंतर समजला, पण मला त्याच्याशी काहीच घेणंदेणं नाही... एक फार मोठे बंगाली दिग्दर्शक होते, कम्युनिस्ट होते, पण त्यांचे सिनेमे मला खूप आवडायचे... अभिजीत पानसेचं कामही मला आवडतं... " 


पुढे बोलताना संजय मिश्रा म्हणाले की, "राज ठाकरेंनी मला भेटायला बोलावलं. तिथे माझ्यासोबत गप्पा मारायला बसतानाच त्यांनी सर्वांना सांगितलं, आज संजय आलाय, आपण सर्व हिंदीत बोलूयात... मला एक गोष्ट खूप चांगली वाटतेय की, एकीकडे अशा प्रकारची चांगली गोष्ट होतेय आणि आपण सगळे एकत्र येऊन एक प्रयत्न करत असू की हिंदीत मराठी नाटक... यातही महत्त्वाचा वाटा अभिजीत पानसेंचा आहे... याचं श्रेय कोण घेणार?" 


पाहा व्हिडीओ : Sanjay Mishra Majha Katta : राज ठाकरे म्हणाले, संजय आलाय..हिंदीत चर्चा करा



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sanjay Mishra Buys Sea Facing Apartment In Mumbai: कधीकाळी 150 रुपये रोज काम करायचा 'हा' अभिनेता, आज मुंबईत खरेदी केलंय 4.75 कोटींचं सी फेसींग अपार्टमेंट