Sanjay Dutt : कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये फिल्मी कलाकार केवळ धमाल-मस्ती करत नाहीत, तर आपल्या आयुष्यातील गोड-कटू अनुभवसुद्धा सांगत असतात. संजय दत्त जेव्हा या शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता, तेव्हा त्याने तुरुंगात घालवलेल्या दिवसांच्या अनेक आठवणी शेअर केल्या. सुपरस्टारने सांगितले की, त्याने तुरुंगात राहून एक रेडिओ कार्यक्रम चालवला होता आणि कैद्यांसोबत एक थिएटर ग्रुपचे दिग्दर्शन केले होते.

संजय दत्त हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्यांचं आयुष्य अगदी एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीसारखेच आहे, ज्यात चढ-उतार, वळणं आणि ट्विस्ट भरलेले आहेत. त्याने जीवनातील अत्यंत वाईट प्रसंग पाहिले तसेच मोठ्या यशाची शिखरं गाठली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक दुःखद प्रसंग आले. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांचे आई-वडील – सुनील दत्त आणि नर्गिस यांचे निधन.

संजय दत्त यांच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ तो होता, जेव्हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामुळे त्यांना तुरुंगवास झाला. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये त्यांनी जेलमधील अनुभव उघडपणे सांगितले. संजय दत्त म्हणाला, “माझ्या आयुष्यात जे काही घडले त्याबद्दल मला कुठलाही पश्चाताप नाही. फक्त एक गोष्ट आहे, ज्याचा खेद वाटतो – माझे आई-वडील मला खूप लवकर सोडून गेले. मी त्यांना खूप आठवतो.”

संजय दत्त जेव्हा सेटवर भावुक झाला, तेव्हा काही क्षणांसाठी वातावरण गंभीर झाले. मोठी व्यक्ती असूनही ते आपल्या दुःखाला अजूनही सामोरे जातात. अर्चना पूरन सिंह यांनी जेव्हा त्यांना तुरुंगातील त्यांची लाकडी कामाची कला विचारली, तेव्हा संजय यांनी सांगितले की त्यांनी मजुरीसाठी फर्निचर आणि कागदाच्या पिशव्या तयार केल्या. त्यांची सर्जनशीलता इथेच थांबली नाही. त्यांनी तुरुंगात एक रेडिओ कार्यक्रम सुरू केले, ज्याला ‘रेडिओ वायसीपी’ असे नाव दिले. संजय म्हणाले, “हे फक्त तुरुंगाच्या आतच सुरु असे. यासाठी मला मोबदला मिळत होता. आम्ही बोलण्यासाठी विषय निवडत असू, थोडीफार कॉमेडी करत असू. इतर तीन-चार कैदी या कार्यक्रमांसाठी स्क्रिप्ट लिहायचे.”

केवळ रेडिओच नाही, तर त्यांनी तुरुंगात एक थिएटर ग्रुपही स्थापन केला. ते म्हणाले, “मी दिग्दर्शक होतो आणि खूनाच्या आरोपाखालील कैदी माझे अभिनेते होते.” अशा प्रतिकूल वातावरणात जिवंत राहण्यासाठी त्यांनी कलेचा आधार घेतला.

संजय दत्त यांनी तुरुंगातील एक भयानक आठवणही सांगितली. त्यांनी सांगितले, “सुपरिंटेंडेंटने माझ्याकडे मिश्रा नावाच्या माणसाला पाठवले. त्याने वस्तारा बाहेर काढला. मी त्याला विचारले की तो किती वर्षांपासून जेलमध्ये आहे, त्याने सांगितले 15 वर्षे. मी विचारले कोणत्या गुन्ह्यासाठी, तर त्याने उत्तर दिले ‘डबल मर्डर’. तोपर्यंत वस्तारा माझ्या गळ्यापर्यंत पोहोचला होता. मी लगेच त्याचा हात पकडला आणि त्याला थांबवले. डबल मर्डरच्या गुन्हेगाराच्या हातात वस्तारा – ही तुरुंगातील साधीशी गोष्ट होती.” सध्या संजय दत्त ‘बागी 4’ या चित्रपटात चाकोच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट 5 सप्टेंबरला प्रदर्शित झाला. त्यापूर्वी ते ‘हाऊसफुल 5’मध्ये झळकले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जत्रा : ह्यालागाड-त्यालागाड सिनेमाची टीम पुन्हा एकत्र; कोंबडी पळाली गाण्यावर भन्नाट डान्स