sanjay dutt buys brand new luxury mercedes : संजय दत्त बॉलिवूड इंडस्ट्रीतील दमदार कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र या वेळेस कोणत्याही चित्रपटाच्या रिलीजमुळे नाही, तर त्यांच्या महागड्या आणि आलिशान गाड्यांबाबत शौकीन असल्यामुळे तो चर्चेत आला आहे. संजय दत्त याने नुकतीच एक चककणारी नवी मर्सिडीज मेबॅक GLS600 कार विकत घेतली आहे. या गाडीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या गाडीची किंमत ऐकून कुणाच्याही डोळ्यांचे पारणे फिटेतील.
संजय दत्त यांच्या Mercedes Maybach GLS600 या कारची किंमत तब्बल 3.71 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. ही गाडी त्यांनी घेतल्याचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत संजय दत्त आपल्या काळ्या रंगाच्या चकाकत्या SUV गाडीपाशी उभा असल्याचं दिसत आहे. त्यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ब्राउन कार्गो पॅन्ट घातलेला असून त्यांचा कॅज्युअल लूकदेखील खूपच देखणा दिसत आहे.
संजय दत्त यांच्या नव्या गाडीचा व्हिडिओ व्हायरल
गाडीच्या फ्रंट ग्रिलवर झेंडूच्या फुलांची माळ आणि बोनेट देखील फुलांनी सजवलेलं पाहायला मिळत आहे. ही नवी गाडी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर उभी असल्याचं दिसून आलं. एका क्लिपमध्ये संजय दत्त यांचा ड्रायव्हर ही आलिशान SUV चालवताना दिसतो, तर आजूबाजूला जमलेले लोक त्यांच्या कलेक्शनमध्ये झालेल्या या नव्या भराची स्तुती करताना दिसतात.
‘बागी 4’ मध्ये दिसणार संजय दत्त
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर संजय दत्त शेवटच्या वेळेस ‘द भूतनी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात सनी सिंग आणि मौनी रॉयही झळकले होते. आता त्यांचा पुढचा चित्रपट ‘बागी 4’ प्रेक्षकांसमोर येणार आहे. यात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट साजिद नाडियाडवाला यांनी निर्मिती केला असून 5 सप्टेंबर 2025 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या