Sangeet Baari Te Vaari Marathi Theatre Play: महाराष्ट्राच्या लोककलेत (Folk Art Of Maharashtra) खोलवर रुजलेली बारी आणि वारीची परंपरा आता रंगभूमीवर नव्या रुपात अनुभवायला मिळणार आहे. 'संगीत बारी ते वारी' (Sangeet Baari Te Vaari) हे नवं संगीतमय नाटक रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय मेजवानी ठरणार आहे. या नाटकात (Theatre Play) वारीची भक्तीभावाची झलक, लोककलेचा ठसा, तसेच जीवनातील संघर्ष आणि आनंद यांचं अप्रतिम चित्रण पाहायला मिळणार आहे. गायन, वादन, नृत्य आणि नाटक यांचा संगम घडवणारे हे प्रयोग प्रेक्षकांना रंगतदार अनुभव देणार आहेत.
मेघा वि.रा.एंटरटेनमेंट निर्मित 'संगीत बारी ते वारी' या नाटकाची संकल्पना मेघा घाडगे यांची असून या नाटकाचं लेखन नचिकेत दांडेकर यांनी केलं आहे. नाटकाचं दिग्दर्शन संकेत पाटील यांनी केलं आहे. नृत्यदिग्दर्शन योगेश देशमुख यांचं असून, संगीताची जबाबदारी आशुतोष वाघमारे यांनी सांभाळली आहे. आणि नाटकातील सर्व गीतं अनिकेत कदम यांची आहेत.
नेपथ्य देवाशिष भरवडे, प्रकाशयोजना कुलभूषण देसाई आणि प्रणाली, मेघा, प्रज्ञश्री यांनी केलेल्या वेशभूषेचा अप्रतिम मिलाफ या नाटकात अनुभवायला मिळणार आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यांच्यासोबत संजना पाटील, शिरीष पवार, विद्याधर नामपल्ले आणि इतर कलाकारही या नाटकात आहेत. सप्तसूर म्युझिक चॅनल म्युझिक पार्टनर आहे. खुशबू जाधव या नाटकाच्या सहनिर्माती असून आगामी काळात महाराष्ट्रभर हे नाटक रसिकांसमोर येणार आहे. लोककलेची परंपरा रंगभूमीवर नेणारं हे नाटक नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहील, असा विश्वास या नाटकाच्या निर्मात्या मेघा घाडगे यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Kamali Zee Marathi Serial: इतिहास रचला! झी मराठीच्या 'कमळी'नं गाठलं न्यूयॉर्कचं 'टाईम्स स्क्वेअर'