Harshvardhan Ranes Next Big Action Thriller: 'सनमतेरीकसम'फेम अभिनेता हर्षवर्धन राणे याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी. हर्षवर्धन लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत 'शूटआउटअॅटदुबई' या चित्रपटात तो झळकणार असून, या आगामी चित्रपटासाठी चाहते, तसेच प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात त्याचा नेमका कोणता लूक असणार?हर्षवर्धन नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार? याची माहिती लवकरच समोर येईल.
बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहे. मीडियारिपोर्ट्सनुसार, एकता कपूरने कमर्शियलीअपीलिंगप्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित केलं आहे. यापूर्वी एकता कपूर कंटेटबेस्ड चित्रपट, वेब सिरीज आणि टिव्हीशोवर लक्ष केंद्रित केले होते. गेल्या काही वर्षांत एकताच्या प्रॉडक्शन हाउस, टेलिफिल्म्सने यशस्वी प्रोजेक्ट्स दिले आहेत.
एकता कपूर आता लवकरच नवा जॉनरचा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मीडियारिपोर्ट्सनुसार, शूटआउटअॅट दुबईचे चित्रीकरण लवकरच होणार आहे. दरम्यान, या अॅक्शनथ्रिलर चित्रपटाच्या कथानकाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या चित्रपटाच्या शीर्षकावरून असे सूचित होते की, या चित्रपटाची कथा दुबईच्या ग्लॅमरस आणि धोकादायक जगाभोवती फिरेल. दरम्यान, या चित्रपटात अॅक्शनचा तडाखा असेल, एवढं मात्र नक्की. दरम्यान, या चित्रपटाची सध्या समाजमाध्यमांमध्ये चर्चा होत आहे.
'सनमतेरीकसम' या चित्रपटातून मिळाली प्रसिद्धी
हर्षवर्धन राणे याच्या करिअरची सुरूवात 2010 साली झाली होती. ThakitaThakita या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. यानंतर ते NaaIshtam, Avanu या चित्रपटात दिसले होते. यानंतर हर्षवर्धनInfinity या शॉर्टफिल्ममध्ये झळकला होता. त्यानं फक्त शॉर्टफिल्म नसून, तामिळ तसेच तेलुगू चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 2016मध्ये त्यांनइंदर लालची भूमिका साकारत 'सनमतेरीकसम' या चित्रपटात काम केले. त्यावेळी हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. परंतु, या चित्रपटातील गाणी हिट झाली होती. चाहत्यांनी या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
