Samrenu : पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या हस्ते 'समरेणू' (Samrenu) चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटातील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या शीर्षकगीतात सम्या आणि रेणूची निखळ प्रेमकहाणी अनुभवायला मिळत आहे. एका निसर्गरम्य गावात या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. 


'समरेणू'चे दिग्दर्शक, लेखक महेश डोंगरे म्हणतात,  "हे गाणे सम्या आणि रेणू यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातून सम्या आणि रेणूचे घनिष्ठ नाते दिसत आहे. मात्र शेवटी हे नाते कोणत्या वळणावर जाते, हे चित्रपटात दिसणार आहे." समरेणू' चित्रपटामध्ये महेश डोंगरे आणि रुचिता मांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या गाण्यामध्ये रेणू आणि सम्याच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


13 मे रोजी समरेणू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'समरेणू' हे शीर्षकगीत सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गायले आहे. या प्रेमगीताला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून सूरज- धीरज यांचे संगीत लाभले आहे. 'समरेणू' ची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची वाट उत्सुकतेने पाहात आहेत. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha