Sameer Wankhede On Drug Consumption: शाळेतील मुलांना 'खान' अन् 'पुष्पा' (Pushpa) हिरो वाटतात, त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडेचं नावही ऐकलेलं नाही, असं वक्तव्य बहुचर्चित राहिलेले माजी NCB आणि IRS अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी केलं आहे. एका कार्यक्रमात तरुणांना संबोधित करताना समीर वानखेडे यांनी ही खंत बोलून दाखवली. दरम्यान, मनसेकडून आज युवा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेलं. त्यावेळी या सोहळ्यासाठी समीर वानखेडे उपस्थित होते. त्यासोबतच मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray), बाळा नांदगावकरही (Bala Nandgaonkar) उपस्थित होते.

Continues below advertisement

समीर वानखेडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी आतापासून सुरू करण्याचा सल्ला दिला. "इन्स्टाग्रामपेक्षा सामान्य ज्ञानावर भर द्या, रोज अभ्यास करा आणि वर्तमानपत्र वाचा...", असंही सांगितलं. दरम्यान, युवकांनी आपले आदर्श कोणाला मानावं, यावरही वानखेडे यांनी भाष्य केलंय.

समीर वानखेडे यांनी बोलायला सुरुवात करतानाच 'वंदे मातरम्...' म्हटलं, तसेच उपस्थित तरुणांनाही त्यांना प्रतिसाद दिला, पण तेवढ्यात 'वंदे मातरम्'चा मला प्रतिसाद येत नाही, असं समीर वानखेडे म्हणाले, त्यावेळी उपस्थित तरुणांनी मोठ्यानं 'वंदे मातरम्...' म्हणत समीर वानखेडेंना प्रतिसाद दिला. 

Continues below advertisement

समीर वानखेडे बोलताना नेमकं काय म्हणाले? (Sameer Wankhede On MPSC, UPSC)

समीर वानखेडे म्हणाले की, "मला जेव्हा कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी फोन आला, त्यावेळी मी ड्युटीवर होतो. त्यावेळी मला एक कार्यक्रम आहे मुलांचा, तुम्ही या आणि त्यांच्याशी संवाद साधा, असं मला विचारणा झाली. जेव्हा मुलांशी बोलायचं असतं तेव्हा मी ही संधी कधी सोडत नाही. मला असं वाटतं की, युवक वर्ग आहे, मोठी जनसंख्या आणि महत्वाचा वाटा आहे तुमचा... विद्यार्थी होते म्हणून मी आलो... पहिल्यांदा तुमचे अभिनंदन... माझ्यापेक्षा तुम्ही आता एक्सपर्ट आहात, तुमच्याकडे यूपीएससी चे पर्याय आहेत. MPSC असे पर्याय आहेत. जर तुम्हाला तयारी करायची आहे तर आतापासून सुरुवात करा. इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुकपेक्षा जनरल नॉलेज वर भार ठेवा. रोज चांगला अभ्यास करा... रोज पेपर वाचा. तुमच्याकडे बॅकअप प्लान पण ठेवा. जर तुम्ही परीक्षा नाही पास झालात तर... जर कोणाला आर्मी मधे रुजू व्हायचं आहे..."

"महाराष्ट्राची मूल जी आहेत, त्याची UPSC मध्ये टक्केवारी फार कमी आहे... यूपी बिहार, राजस्थान, इकडची टक्केवारी जास्त... महाराष्ट्रचे प्रश्न सोडवायचे असतील, तर मराठी अधिकारी झाले पाहिजेत... मी मराठी असून मी आंध्र प्रदेश, चेन्नईमध्ये कार्यरत आहे...", असं समीर वानखेडे म्हणाले. 

देशात ड्रग्सचा प्रश्न मोठा... : समीर वानखेडे (Sameer Wankhede On Drugs)

पुढे बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, "देशात ड्रग्सचा प्रश्न मोठा आहे, अनेक प्रकारचे ड्रग आहेत. MD असे घातक ड्रग आहेत... हे ड्रग घेतल्यानंतर नाती कळत नाही... आणि हे ड्रग विकणारे शाळा कॉलेज टार्गेट करतात... दुसरा एक गांजा... गांजा सेवन केल्यानंतर अनेक आत्महत्या केसेस झाल्या आहेत. नेस्कोमध्ये दोघांचा जीव गेला... विद्यार्थी होते... त्यांनी पार्टी ड्रग घेतले होते."

"जे रेव्ह पार्टीमधे घेतलं जातं... ते घेतलं तर, सलग 8-9 तास तो व्यक्ती डान्स करतो... काही समजणार नाही काय सुरू आहे ते, त्यांनी 8 तास डान्स केला. शरीरावर परिणाम झाला आणि जागेवर त्यांचा जीव गेला. तुम्हाला या सगळ्यापासून लांब रहायचं आहे. ड्रग सेवन कारण हे कायदेशील गुन्हा. मोठ्या प्रमाणात कोणाकडे सापडले तर त्याची शिक्षा 20 वर्षाची. 2 ग्राम जरी MD सापडले तर त्याची शिक्षा आहे 10 वर्ष. कोणी सेवन करतो तर त्याची शिक्षा आहे 1 वर्ष. तुम्ही फक्त तुमच्या शरीरावर नाही तर राष्ट्रीय सुरक्षा वर देखील परिणाम होतात, हे पैसे आतंकवादी पर्यंत पोचतात, आणि आपलेच पैसे आपल्या भारताविरोधात वापरले जातात.", असं समीर वानखेडे म्हणाले. 

तानाजी मालुसरे, बाजी प्रभु देशपांडे, यांची नाव तुम्ही कधी एकली आहेत का? : समीर वानखेडे

"आपली नवीन पिढी कुठेतरी आपण चुकत आहोत अस मला वाटतं. मी एका छोट्या मुलाला विचारलं की, तुझा हिरो कोण तर त्यानं एका खानाचं नाव घेतलं... असं दोन तीन जणांना विचारलं एक जण बोलला 'पुष्पा'. शिक्षकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. तानाजी मालुसरे, बाजी प्रभु देशपांडे, यांची नाव तुम्ही कधी एकली आहेत का?  मी त्यांना सांगितलं हिरो म्हणजे, छत्रपती महाराज...", असं समीर वानखेडे म्हणाले.

"कुठे तरी आपण चुकतोय... काहीतरी हरवून जातंय... आपलं आयुष्य घडवायचं आहे, तर असे हिरो पाहिजे,  तुम्ही वाचा त्यांच्याबद्दल... शिवजयंती, 15 ऑगस्ट तेव्हाच फक्त घोषणा द्यायच्या का? रोजच्या दिवशी 10 मिनिटे तुम्ही त्यांच्या बद्दल वाचा... राष्ट्राची सेवा करा...", असं समीर वानखेडे म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Samay Raina Bihari Joke Row: समय रैना 'इंडियाज गॉट लेटंट 2' मध्ये शेरॉनला म्हणाला, 'तुम्ही बिहारी नोकरीसाठी मुंबईत येता...'; मनोज वाजपेयी संतापून म्हणाले...