Samay Raina Dating Roumers: कॉमेडियन समय रैना कायम कुठल्या ना कुठल्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो नाहीतर चर्चेत असतो. नुकत्याच झालेल्या इंडियाज गॉट लेटंटच्या दुसऱ्या सीजनमुळे तो चर्चेत आला होता .पण यावेळी समय रैनाच्या चर्चेत राहण्याचे कारण वेगळं आहे.त्याची आणि 12th फेल या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांना जोर आलाय.दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. त्या दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांना दोघांमध्ये मैत्रीहून अधिक नातं असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की समय रैना आणि अभिनेत्री मेधा शंकर एका कार्यक्रमात एकत्र दिसले. मात्र, पापाराझीना पाहताच ते आपापल्या मार्गाला निघून गेले. त्यामुळे माध्यमांचे लक्ष टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचं अनेक जण सोशल मीडियावर म्हणत आहेत.
आतापर्यंत समय आणि मेधा यांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे.त्यांच्या डेटिंगच्या चर्चा पसरण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशा अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावल्याचा चहात्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. दरम्यान, दोघांपैकी कोणीही या चर्चेला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
समय रैनाच्या त्या व्हिडीओमुळे चर्चेला उधाण
समय रहना आणि अभिनेत्री मेधा शंकर या दोघांच्याही डेटिंगच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये समय रहना आणि अभिनेत्री मेधा शंकर या दोघेही पाठोपाठ पापाराझींना चुकवत बाहेर पडले . त्यांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. पण एका कार्यक्रमात कॅमेरा दिसताच त्यांनी आपापले मार्ग बदलले. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या अफवांच्या चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान मेधा शंकर 'गिनी वेड्स सनी 2' या चित्रपटात शेवटची दिसली होती.या चित्रपटात अविनाश तिवारी आणि मेधा शंकर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. गिन्नी वेड्स सनी या 2020 च्या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. तर दुसरीकडे समय रैना त्याच्या वादग्रस्त ' इंडियाज गॉट लेटंट' या वादग्रस्त शो घेऊन पुन्हा एकदा परतला आहे.नेटफ्लिक्स आणि youtube वर एकाच वेळी प्रदर्शित झालेली आहे या पहिल्या एपिसोड मध्ये अल्फा चित्रपटातील अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी या दोघींनी हजेरी लावली होती.
