Samarth Jurel Statement On Dating: 'बिग बॉस 17' मधून प्रसिद्ध झालेल्या समर्थ जुरेल (Samarth Jurel) सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. समर्थ जुरेलची तसं पाहिलं तर ओळख करुन देण्याची गरज नाही. कारण, बिग बॉस 17 (Bigg Boss) चं सीझन ज्या लव्ह ट्रँगलमुळे गाजलं होतं. त्यातील एक समर्थ जुरेल होता. त्याला बेफिकीर अंदाजासाठी तो ओळखला जातो. दरम्यान, बिग बॉस 17 मध्ये ईशा मालवीय सोबतचं त्याचं नातं खूपच चर्चेत होतं. अख्खा सीझन या रिलेशनशिपमुळे गाजला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

समर्थ जुरेल आणि ईशा मालवीय यांनी बिग बॉसच्या घरात त्यांच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं होतं. यावेळी दोघांनीही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असून एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, शो संपल्यानंतर लगेचच दोघांचं ब्रेकअप झालं. पण, ईशा मालवीयाशी ब्रेकअप झाल्यानंतर, अभिनेत्यानं कोणालाही डेट केलेलं नाही. तो सध्या सिंगल लाईफ जगत आहे. 

रिलेशनशिपबाबत बोलताना समर्थ सांगतो की, त्याच्याकडे रिलेशनशिपसारख्या गोष्टींसाठी आता सध्या त्याच्याकडे वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच समर्थ जुरेल पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये गेस्ट म्हणून आला होता. त्यावेळी त्यानं अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्यापैकी एक म्हणजे, ईशा मालवियासोबतचं रिलेशन आणि त्यानंतरचं त्याचं सिंगल लाईफ. त्यावेळी त्यानं सांगितलं की, ईशा मालवियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्यानं अजून कोणालाही डेट केलेलं नाही. तो सध्या सिंगल आहे.

समर्थ जुरेल पुढे बोलताना म्हणाला की, माझ्याकडे खरंतर वेळच नाहीये आणि मी आता सध्या माझ्या कामात खूपच बिझी झालोय. कोणासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी मला संधींच मिळालेली नाही. मी माझं काम आणि स्वतःमध्ये खूप बिझी झालोय." दरम्यान, पारस छाबडाला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की, समर्थ जुरेलकडे गर्लफ्रेंडसाठी किंवा रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी वेळच नाहीय.

पुढे बोलताना समर्थ जुरेलनं धक्कादायक वक्तव्य केलं. समर्थ जुरेल म्हणाला की, माझी फक्त दोन तासांसाठी अफेअर करण्याची इच्छा होते. यावर बोलताना तो म्हणाला की, "माझी गर्लफ्रेंड बनवण्याची इच्छा होते. पण, फक्त एक ते दोन तासांसाठी... ते सुद्धा फक्त रात्री..." हे ऐकून पारस छाबडासुद्धा हैराण झाला होता आणि दोघेही पोट धरुन हसू लागले होते. 

दरम्यान, समर्थ जुरेलनं आपली वाक्य सांभाळत सारवासारव केली. तो म्हणाला की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. अभिनेता म्हणाला की, "ज्यावेळी तो पार्टी दरम्यान, त्याच्या मित्रांना त्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबत पाहतो, त्यावेळी त्याचीही गर्लफ्रेंड बनवण्याची इच्छा होते. पण, नंतर मी स्वतःला समजावतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शुटिंगसाठी घरुन निघून सेटवर पोहोचतो."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Atul Kulkarni Poem: "लोक चिरडले जातात... लोकांची प्रेतं बनतात..."; अतुल कुलकर्णींनी रचलेली नवी कविता 'लोक-मताची डुबकी'