Naga Chaitanya Second Wife Sobhita Dhulipala Pregnant? लग्नानंतर 6 महिन्यातच नागा चैतन्यच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन? दुसरी बायको शोभिता प्रेग्नंट असल्याच्या चर्चा जोरात
Naga Chaitanya Second Wife Sobhita Dhulipala Pregnant: लग्नाच्या सहा महिन्यांतच नागा चैतन्य बाबा होणार? शोभिता धुलिपाला गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण.

Naga Chaitanya Second Wife Sobhita Dhulipala Pregnant: समंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यनं (Naga Chaitanya) दुसरं लग्न केलं असून त्यानं 6 महिन्यांपूर्वी अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी (Sobhita Dhulipala) आपली लग्नगाठ बांधली. दोघांचं लग्न ठरल्यापासूनच हे स्टार कपल चर्चेत होतं. अशातच अलिकडेच शोभिता गरोदर असून लवकरच आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. पण, अद्याप नागा चैतन्य किंवा स्वतः शोभितानं यासंदर्भात कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान, कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी याबाबत खुलासा केला आहे.
शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांचा विवाह 4 डिसेंबर 2024 रोजी हैदराबादमध्ये झाला. नागा चैतन्य आणि शोभितानं कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत आपली लग्नगाठ बांधली. अशातच दोघांच्या लग्नाला सहा महिने होत नाहीत तर शोभिता आई होणार असल्याची अफवा पसरली आहे. शोभिता आणि नगा चैतन्य अलीकडेच मुंबईत पार पडलेल्या वेव्हज 2025 साठी उपस्थित होते. यावेळी शोभितानं साडी नेसली होती आणि त्याचवेळी शोभितानं पदर पुढे घेतला होता. तेव्हापासून शोभिता गरोदर असून ती आपला बेबी बंप लपवत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
दरम्यान, शोभिता धुलिपाला किंवा नागा चैतन्य यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण, कुटुंबातील एका व्यक्तीनं ईटाइम्सशी बोलताना शोभिता गरोदर असल्याचं वृत्त पूर्णपणे फेटाळून लावलं. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, "शोभितानं मॅटरनिटी नाही तर अँटी-फिट कपडे घातलेले. फक्त या एका बदलामुळे एका नव्या अफवेला जन्म कसा मिळू शकतो, हे आश्चर्यकारक आहे."
शोभिता धुलिपालाची पोस्ट
View this post on Instagram
नागा चैतन्य म्हणजे, दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मोठा मुलगा. नागा चैतन्यनं आपली लग्नगाठ साऊथ अभिनेत्री समंथा रूथ प्रभूसोबत बांधली होती. दोघांनी 2015 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. तर, 2017 मध्ये दोघांनीही आपली लग्नगाठ बांधली. पण, लग्नानंतर काही वर्षांतच दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडला आणि 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
2024 मध्ये शोभितासोबत नागानं पुन्हा थाटला संसार
समंथासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य शोभिता धुलिपालच्या प्रेमात पडला. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2024 मध्ये लग्न केलं. दरम्यान, समंथाचे चाहते अनेकदा शोभिताला ट्रोल करत असतात आणि तिच्या पोस्टवर कमेंट करत असतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























