Samantha Ruth Prabhu Dating: साऊथ सुपरस्टार समंथा रूथ प्रभू (South Superstar Samantha Ruth Prabhu) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नागा चैतन्यशी घटस्फोट (Naga Chaitanya Samantha Ruth Prabhu Divorce) झाल्यानंतर समंथानं 200 कोटींची पोटगी घेतल्याचं बोललं जात होतं. पण, काही दिवसांपूर्वी स्वतः नागा चैतन्यनं (Naga Chaitanya) सर्व अफवा फेटाळल्या आणि असं काहीच घडलं नसल्याचं सांगितलं. नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटाच्या मोठ्या चर्चा इंडस्ट्रीत झाल्या. कुणी समंथावर टीका केली, तर कुणी तिचा बाजू घेतली. पण, समंथानं कधीच याकडे लक्ष दिलं नाही किंवा कोणतंही स्पष्टीकरण देण्याच्या फंद्यात पडली नाही. अशातच आता पुन्हा एकदा समंथाच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या समंथाच्या लव्ह लाईफबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, समंथा रूथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरु (Director Raj Nidimoru) एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. पण, डेटिंगच्या चर्चांवर दोघांपैकी कुणीच काही बोललेलं नाही.  

समांथा अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. त्यावेळी तिच्या अनेक फोटोंमध्ये दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत दिसते. मिडिया रिपोर्टनुसार, दोघांमधील नातं अधिक घट्ट झालं आहे आणि या वर्षाच्या अखेरिस आता दोघेही आपल्या नात्याला नाव देऊ शकतात, असं बोललं जात आहे. 

समांथा रूथ प्रभू पुन्हा लग्न करणार? (Will Samantha Ruth Prabhu Get Married Again?)

डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, जसे दिवस पुढे सरले, तसं दोघांमधील नातं अधिक घट्ट झालंय. दोघेही या वर्षाच्या अखेरीस त्यांचं नातं अधिकृत करण्याचा विचार करत आहेत. दोघेही एकमेकांशी कमिटेड आहेत. चाहत्यांना आशा आहे की, समांथा तिच्या आयुष्यात पुढे जाईल आणि पुन्हा लग्न करू शकेल. दरम्यान, दोघांच्या लग्नाबद्दल अद्याप कोणतीही बातमी समोर आलेली नाही. मात्र, दोघांच्या नात्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. 

समंथा-राज निदिमोरु लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये? (Samantha-Raj Nidimoru In Live-In Relationship?)

समंथा रूथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरु दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. पण, दोघांच्याही टीमकडून लिव्ह-इन रिलेशनशिपच्या बातम्या फेटाळल्या गेल्या. तसेच, हे वृत्त चुकीचं असल्याचंही सांगितलं गेलं. 

दरम्यान, राज निदिमोरूनं 2015 मध्ये श्यामली डेशी लग्न केलं होतं. दोघेही 2022 मध्ये वेगळे झाले. पण, आतापर्यंत दोघांचाही घटस्फोट झालाय की नाही? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर समंथाबाबत बोलायचं झालं तर, तिनं 2017 मध्ये नागा चैतन्यशी लग्न केलं. हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि 2021 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shefali Jariwala Took IV Drip On Her Death Day: शेफालीचा मृत्यू 'त्या' आयव्ही ड्रिपमुळे? मृत्यूला तीन दिवस उलटल्यानंतर जवळच्या मैत्रिणीचा मोठा खुलासा