Salman Khan on Emraan Hashmi: 23 वर्षांच्या काळानंतर अभिनेता इम्रान हाश्मीचा (Emraan Hashmi) कमबॅक झाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ' आवारापन 2' (Awarapan 2) या चित्रपटाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 5 दिवसांत या सिनेमाने 100 कोटींची बॉक्स ऑफिस कमाई (Box Office Collection) केली आहे. इतकंच नाही तर, अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्सही मोडले. या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. प्रदर्शनानंतर या चित्रपटाची तुफान चर्चा झाली. इम्रान हाश्मीने साकारलेलं पात्र शिव पंडितला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. इम्रान हाश्मीच्या मेहनतीला खरं यश मिळतंय, असं आता म्हणावं लागेल. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) याआधी इम्रान हाश्मीच्या संबंधित एक भविष्यवाणी केली होती. जी आज खरी (Entertainment) ठरली आहे.
सलमान खानचा इम्रान हाश्मीला पाठिंबा (Salman Khans 14-Year-Old Prediction About Emraan Hashmi)
इम्रान हाश्मीकडे जेव्हा सिनेसृष्टी दुर्लक्ष करत होती. तेव्हा सलमान खानने त्याला पाठिंबा दिला होता. 2012 साली, सलमानने त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या ' इश्क इन पॅरिस ' या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात इम्रान हाश्मीची प्रशंसा केली होती. तेव्हा सलमान खान म्हटला होता की, इम्रान हाश्मी हा एक ' अंडररेटेड अभिनेता ' आहे, असं म्हटलं होतं. त्याला जी ओळख मिळायला हवी होती, ती ओळख मिळत नाहीये, असं त्याने म्हटलं.
इम्रानला भविष्यात त्याच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल, असं देखील सलमान खान म्हटला होता. यावरून हे स्पष्ट होते, की सलमान खानचा इम्रान हाश्मीला पाठिंबा होता. सलमान खानचा पाठिंबा इम्रानच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला.
आता, १४ वर्षांनंतर, 'अवारपन २' चे यश हे सिद्ध करते की सलमानचे भाकीत खरे ठरले आहे. सलमान खान आणि इम्रान हाश्मी ही जोडी पहिल्यांदा ' टायगर 3 ' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. हा सिनेमा 2023 साली प्रदर्शित झाला होता. हा स्पाय थ्रिलर सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
