एक्स्प्लोर

Salman Khan Warns Paparazzi: मध्यरात्री 3 वाजता रुग्णालयापर्यंत पाठलाग, पॅपाराझींचा घोळका दिसताच सलमान खान प्रचंड चिडला, म्हणाला, 'साठीचा झालोय पण आजही 100 जणांना लोळवेन'

Salman Khan Warns Paparazzi: सलमान खान मध्यरात्री मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाबाहेर पॅपाराझींवर चिडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला. आता या संपूर्ण घटनेवर त्यानं सोशल मीडियावर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

Salman Khan Warns Paparazzi: बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसला तरी, गेल्या काही दिवसांपासून तो आपले इमोशन्स, नाराजी आणि प्रेम चाहत्यांसोबत शेअर करतोय. नुकतीच त्यानं एकटेपणावर केलेली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली. अशातच आता सलमान खाननं पॅपाराझींवर निशणा (Salman Khan Warns Paparazzi Video) साधत एक, दोन नव्हे तर तब्बल चार पोस्ट केल्या आहेत. सलमान खाननं (Actor Salman Khan) त्याचे चार वेगवेगळे फोटो शेअर करत माध्यमांना आणि पॅपाराझींना कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यामुळे सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

सलमान खान मध्यरात्री मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाबाहेर पॅपाराझींवर चिडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला. आता या संपूर्ण घटनेवर त्यानं सोशल मीडियावर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खान यानं पहाटे 3 वाजता इन्स्टाग्रामवर काही सेल्फी पोस्ट करत रुग्णालयाबाहेरील फोटोग्राफर्सच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

नेमकं झालं काय? 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालेला. या व्हिडीओमध्ये सलमान खान हिंदुजा रुग्णालयाबाहेर स्पॉट झालेला आणि त्याला पॅपाराझी कॅमेऱ्यात कैद करत असताना तो पॅपाराझींवर संतापला. सलमान खान घरातून निघाल्यापासून अगदी रुग्णालयापर्यंत त्याचा पाठलाग करत पॅपाराझी फोटो आणि व्हिडीओसाठी आरडाओरडा करत होते. त्यांच्या या कृत्यामुळे सलमान खाननं संयम गमावला आणि चांगलाच भडकला. व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खानचा राग त्याच्या चेहऱ्यावरुन आणि हावभावांवरुन स्पष्ट होतोय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

पॅपाराझींवर चिडल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सलमान खानचं स्पष्टीकरण 

पॅपाराझींवर चिडल्याच्या व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना सलमान खान यानं त्याचे चार वेगवेगळे सेल्फी पोस्ट केले. पहिला सेल्फी पोस्ट करत सलमान खाननं लिहिलंय की, "मी नेहमीच मीडियाला पाठिंबा दिला आहे आणि फोटोग्राफर्सनाही आपलं पोट भरता यावं, याचाच विचार केलाय. तसेच, एखाद्या व्यक्तीच्या कठीण प्रसंगातही त्याचा पाठलाग करून त्यातून 'मज्जा' घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही त्यानं थेट सुनावलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खान चिडला , मध्यरात्री 3 वाजता पोस्ट करत म्हणाला...

सलमान खाननं पुढे म्हटलंय की, "ज्या माध्यमांच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहिलोय, त्यांच्याशी बोललोय, त्यांची काळजी घेतलीय... नेहमीच याची काळजी घेतलीय की, त्यांनाही त्यांचं पोट भरता यावं... पण, जर ते माझं नुकसान करुन पैसे कमावू इच्छित असतील... तर त्यांनी शांतच बसावं, मज्जा घेऊ नये..." अभिनेत्यानं माझा आगामी सिनेमा 'मातृभूमि: मई वॉर रेस्ट इन पीस' याचाही उल्लेख केला आणि प्रश्न उपस्थित केला की, "एक फोटो कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यापेक्षा जास्त किमती आहे...?"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खान संतापला...

आणखी एका पोस्टमध्ये त्यानं लिहिलंय की, सलमान खाननं फोटोग्राफर्सना इमोशनल कंडीशनचा फायदा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे ताकीद देत म्हटलंय की, वाढत्या वयाचा विचार केला तरिही, मला अजूनही लढता येतं. 

सलमान खान म्हणाला की, "आजही शंभर जणांना मी जाळून खाक करू शकतो... पुढच्या वेळी, फक्त दुखःत असेल, तेव्हा माझ्या वाटेत येऊन बघा... फक्त एकदा प्रयत्न करून बघा... ज्यावेळी तुमचं कुणी हॉस्पिटलमध्ये असेल, तेव्हा मी असंच वागायचं का? मी वयाच्या साठीत आलोय, पण लढायचं कसं हे अजिबात विसरलेलो नाही... "

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood Panchnama (@bollywoodpanchnama)

सलमान खान भडकला VIDEO

मध्यरात्री सलमान खान हिंदुजा रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट झाला. त्यावेळी पॅपाराझींच्या वागण्यामुळे तो खूपच चिडल्याचं पाहायला मिळालं. सध्या सलमान खान चिडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फोटोग्राफर्सनी सलमान खानला तेव्हा पाहिलं, ज्यावेळी त्याची गाडी ट्रॅफिक सिग्नलबाहेर थांबलेली आणि त्यानंतर रुग्णालयापर्यंत त्याचा पाठलाग केला. जसा तो रुग्णालयातून बाहेर पडला, त्यावेळी काही फोटोग्राफर्सनी त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी भाई-भाई अशा हाका मारायला सुरुवात केली. त्यावेळी सलमान खाननं रुग्णालय आहे, शांत बसा असं सांगितलं आणि त्यांना विचारलं की, तुमच्या कुटुंबातलं कुणी रुग्णालयात दाखल असेल तर तुम्ही असंच वागाल का?, असं सलमान चिडून विचारतोय.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KGF Star Yash Buys New Property In Alibaug: 4000 कोटींच्या 'रामायण'चा रावण आता अलिबागकर; खरेदी केली कोट्यवधींची सी-फेसिंग प्रॉपर्टी, शाहरुख-विराटसह 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींचा शेजारी
4000 कोटींच्या 'रामायण'चा रावण आता अलिबागकर; खरेदी केली कोट्यवधींची सी-फेसिंग प्रॉपर्टी, शाहरुख-विराटसह 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींचा शेजारी
Maa Behen: बॉडी लपवण्याच्या नादात उडाली तारांबळ; 'मां बहन' सिनेमात क्राइम, कॉमेडी अन् ग्लॅमरचा तडका; सिनेमा घरी बसून पाहा
बॉडी लपवण्याच्या नादात उडाली तारांबळ; 'मां बहन' सिनेमात क्राइम, कॉमेडी अन् ग्लॅमरचा तडका; सिनेमा घरी बसून पाहा
Subodh Bhave: परदेशातही कामाची धडपड! स्वित्झर्लंडमध्ये 'वीण दोघांतली ही तुटेना'चं शूटिंग, सुबोध भावेंचा VIDEO व्हायरल
परदेशातही कामाची धडपड! स्वित्झर्लंडमध्ये 'वीण दोघांतली ही तुटेना'चं शूटिंग, सुबोध भावेंचा VIDEO व्हायरल
Shilpa Shinde: हिना खानच्या आजारावर शिल्पा शिंदेचं तिखट शब्दांत वार, अभिनेत्री भडकली, इन्स्टा पोस्टवर पीएम मोदींना केलं आवाहन
हिना खानच्या आजारावर शिल्पा शिंदेचं तिखट शब्दांत वार, अभिनेत्री भडकली, इन्स्टा पोस्टवर पीएम मोदींना केलं आवाहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Embed widget