Salman Khan Praises Captain Smit Machchhar: कॅप्टन स्मित मच्छर (Captain Smit Machchhar) यांची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. त्यांनी दाखवलेल्या शौर्याची आणि प्रसंगावधानाचे विशेष कौतुक होत आहे.   30 ऑक्टोबर रोजी विमानात त्यांनी ज्या प्रकारे हुशारीने अगदी कठीण परिस्थिती हाताळली, याचे विशेष कौतुक होत आहे. केवळ नेते मंडळी, सामान्य व्यक्तींनी नाही तर, बॉलिवूडमधील (Bollywood) काही दिग्गज सेलिब्रिटींनीही स्मित मच्छर यांच्या शौर्याचे कौतुक केले आहे.  रविना टंडन, कंगना रणौत, शिल्पा शेट्टी,  जॅकी श्रॉफ  आणि सोनम  कपूर यांच्यानंतर सलमान खाननेही (Salman Khan) स्मित मच्छर यांचं कौतुक केलं आहे. सलमान खानने पोस्ट शेअर करत आपल्या खास स्टाइलमध्ये स्मित मच्छर यांच्या धैर्याला सलाम केला आहे.  सलमान खानची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यासह शाहरुख खाननेही (Shahrukh Khan) स्मित मच्छरचं कौतुक केलं आहे.

Continues below advertisement

'कमाल कर दिया पायलट जी, वेल डन ब्रो' (Salman Khan Praises Captain Smit Machhar Shahrukh Khan Also praises captain)

सलमान खानने कॅप्टन स्मित मच्छर यांच्या धैर्याचं विशेष कौतुक केलं आहे. सलमान खान सोशल मीडियात सक्रीय असतो.  त्याने अलिकडेच आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने कॅप्टनचं कौतुक करत म्हटलं की, 'कमाल कर दिया पायलट जी... आम्ही सर्व जण तुम्हाला सलाम करत आहोत. तुमच्यासोबत उड्डाण करायला नक्कीच आवडेल.  वेल डन ब्रो'. असं सलमान खानने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. भाईजानचे फॅन्सही कॅप्टन स्मितच्या धैर्याचे कौतुक करत आहे.  सध्या सलमान खानची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सलमान खानसह शाहरुख खाननेही स्मित मच्छरच्या धैर्याचं तोंडभरुन कौतुक केले आहे. त्याने शनिवारी आपल्या अधिकृत सोशल मीडियात पोस्ट शेअर करुन पायलटचं कौतुक केलं. त्याने पोस्टमध्ये म्हटलं की, 'पायलट स्मित मच्छर. तुम्ही कठीण काळात , खंबीरपणे उभे राहिलात. कठीण काळात परिस्थितीला सामोरे जाणे आणि स्वत:च्या सुरक्षेला धोका पत्कारणे सोपे नसते. तुम्ही विमानातील लोकांच्या जीवाचा विचार करुन तेच केलं. कॅप्टन असण्याचा अर्थ काय? हे तुम्ही आम्हाला दाखवून दिले.   हे एक शौर्याचे उत्तम उदाहरण आहे.  तुम्ही लवकराच लवकर बरे व्हा.  देशाला तुमचा अभिमान आहे', असं शाहरुख खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या शाहरुख खानची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन स्मित मच्छर हे खऱ्या आयुष्यातील हिरो बनले आहेत.   ते एक व्यावसायिक पायलट आहेत. स्मित मच्छर हे दुबईहून तेल अवीवला 174 लोकांना घेऊन जाणाऱ्या फ्लायदुबई फ्लाइट FZ1073 मधील एका भीषण घटनेनंतर चर्चेत आले आहेत.   

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'सॅम'च्या मृत्यूचं गूढ उलगडलं? ‘दृश्यम 3’च्या सस्पेन्सने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता; दुसऱ्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार