Salman Khan on Baba Siddique : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये हत्या झाली. त्यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोरच बाबा सिद्दीकी यांच्या गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर एकूण 6 गोळ्या फायर करण्यात आल्या होत्या, त्यातील तीन गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्या. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूच्या राजकीय वर्तुळासह बॉलिवूडमध्येही मोठी खळबळ माजली. दरम्यान त्यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने स्वीकारली असून सलमान खानसोबत (Salman Khan) यांच कनेक्शन लावलं जात आहे. 


बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या वांद्र्यातील घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राजकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी देखील त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी सलमान खान देखील त्यांच्या घरी पोहचला होता. सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांची खास मैत्री होती. 


सलमानचे डोळे डबडबले


जेव्हा सलमान बाबा सिद्दीकी यांचं अत्यंदर्शन घेऊन बाहेर आला तेव्हा त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. सलमानची ही अवस्था पाहून अनेकांचं काळीज हेलावलं. बाबा सिद्दीकींना अखेरचा निरोप द्यायला जेव्हा सलमान आला त्यावेळी आपला मित्र गमावल्याचं दु:ख, निराशा आणि वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या.  


बाबा सिद्दीकींवर सहा राऊंड फायर


आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर सहा राऊंड गोळीबार केला, ज्यामध्ये त्यांना तीन गोळ्या लागल्या. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी कळताच अभिनेता सलमान खान शूटिंग सोडून हॉस्पिटलला रवाना झाला. बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडचा नेता सलमान खानही लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला आहे. बाबा सिद्दीकीच्या मृत्यूनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या अँगलचा पोलिस तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खानला मदत केल्याचा बदला म्हणून बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे.


बिश्नोई गँगने घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी


सोशल मीडियावर बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेत, सलमान खानसोबतची मैत्री याचं कारण असल्याचं म्हटलं आहे. या आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, कुख्यात गुंड दाऊद आणि सलमान खान यांना मदत केल्यामुळे हत्या केल्याचं त्याने या पोस्टमध्ये मान्य केलं आहे.






ही बातमी वाचा : 


Priya Bapat : नाटकांपासून ते हिंदी सिनेमे अन् ओटीटी सगळंच गाजवलं, पण 2018 पासून प्रिया बापटला 'मराठी सिनेमा'ची ऑफरच नाही