Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) मुंबई पोलिसांनी शस्त्र परवाना दिला आहे. बिश्नोई गँगकडून ठार मारण्याची धमकी आल्यानंतर सलमान खानने वेपन्सच्या लायसन्ससाठी अर्ज केला होता. याच संबंधी 22 जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. सलमान खान यांच्या वडिलांना, सलीम खान यांना काही दिवसांपूर्वी धमकीचं पत्र मिळालं होतं.
मुंबई पोलिसांनी सलमान खानला स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना (बंदुकीचा परवाना) जारी केला आहे. 22 जुलै रोजी सलमाननं आर्म्स लायसन्ससाठी अर्ज केला होता. तसेच त्यानं मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट देखील घेतली होती. सलमानच्या वतीनं एका व्यक्तीनं पोलीस मुख्यालयातील संबंधित शाखेतून परवाना घेतला. त्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याला परवाना सुपूर्द करण्यात आला, असे आयपीएस अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रक्रियेनुसार फाइल पडताळणीसाठी आणि गुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्यासाठी झोन 9 च्या पोलिस उपायुक्तांकडे पाठवण्यात आली होती. सर्व काही स्पष्ट झाल्यानंतर मुंबई पोलिस मुख्यालयाने मंजुरीसाठी फाइल क्लिअर केली. 'आम्ही सर्व औपचारिक प्रक्रियापूर्ण केल्यानंतर अभिनेत्याला शस्त्र परवाना जारी केला' अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी मिळाले होते धमकीचे पत्र
सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. पत्रामध्ये 'एलबी' असा उल्लेखा होता. एलबी हा लॉरेन्स बिश्नोई असल्याचा संशय पोलीसांना होता.
बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोई अवघ्या 28 वर्षांचा आहे, तर त्याच्या टोळीतील सदस्य वीस ते पंचवीस वयोगटातील आहेत. मात्र, इतक्या कमी वयात या सर्वांवर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
हेही वाचा: