Saanvi On Salman Khan: बॉलिवूडच्या (Bollywood) टॉप अभिनेत्यांमध्ये आपलं स्थान निश्चित केलेला बॉलिवूडचा दबंग भाईजान म्हणजेच, सलमान खान (Salman Khan). साठीच्या उंबरठ्यावर असलेला सलमान खान आजही अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. पण, अनेकदा त्याचा अॅटिट्यूड, त्याचा इगो, त्याचं विचित्र वागणं याबाबतच्या चर्चा आपण ऐकल्यात. पण, खरंच असं आहे का? याबाबत एका सुपरस्टारच्या मुलीनं खुलासा केला आहे. साऊथ सुपरस्टार (South Superstar) किच्चा सुदीपला (Kichcha Sudeepa) आपण सारेच जाणतो. 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'दबंग 3'मध्ये सलमान आणि किच्चा सुदीपनं एकत्र काम केलं आहे. फिल्ममध्ये सुदीपनं खलनायकाची भूमिका साकारली होती. अशातच आता किच्चा सुदीपच्या मुलीनं एका मुलाखतीत बोलताना सलमान खानबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
किच्चा सुदीपची मुलगी सानवीनं चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान सलमान खानसोबत घडलेल्या एका प्रसंगाबाबत सांगितलं. सानवीनं सांगितलं की, ज्यावेळी ती सलमान खानला भेटली त्यावेळी ती 14 वर्षांची होती आणि सलमान खानसाठी पूर्णपणे वेडी होती. अभिनेत्याच्या मुलीनं असंही म्हटलं आहे की, सलमानबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे, पण खरंच तो व्यक्ती म्हणून खूप चांगला आहे.
किच्चा सुदीपकडून मुलीसाठी सरप्राईज
जिनल मोदीच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना 21 वर्षांच्या सानवीनं सलमानसोबतच्या त्या प्रसंगाबाबत खुलासा केला. ती म्हणाली की, "जेव्हा पप्पा 'दबंग 3' चित्रपटाचं शूटिंग करत होते, त्यावेळी तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. अभिनेत्याची मुलगी पुढे बोलताना म्हणाली की, ती लहान असताना तिनं सलमान खानसाठी एक ब्रेसलेट बनवलं होतं आणि सलमाननं ते ब्रेसलेट बिग बॉसमध्येही वेअर केलं होतं.
पुढे बोलताना सान्वी म्हणाली की, शूटिंगनंतर तिच्या वडिलांनी तिला मुंबईला आणलं आणि ते सलमान खानच्या घरी डिनरसाठी आले, जे सान्वीसाठी एक सरप्राईज होतं. मी सलमान खानला पाहिलं आणि मला विश्वासच बसला नाही. त्यादिवशी त्यांनी मला खूप प्रेमानं वागवलं. सलमान खाननं मला गायलाही सांगितलं. त्यानंतर मी त्यांच्यासाठी एक गाणं गायलं. त्यानं सकाळी 3 वाजता त्यांनी त्यांच्या म्युझिक डायरेक्टरला बोलावलं आणि सांगितलं की, मी या मुलीला पाठवतोय... तू या मुलीला रेकॉर्ड करावं, अशी माझी इच्छा आहे. पुढे आपल्याला कोणत्याही कामासाठी तिच्या आवाजाची गरज भासू शकते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तिथून निघून माझ्या घरी परतले. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या फार्महाऊसवर पुन्हा बोलावलं. माझे आई-वडील माझ्यासोबत आहेत की, नाही, याची त्यांना अजिबात पर्वा नव्हती. सकाळपासून रात्रीपर्यंत मी त्यांच्यासोबतच होते. मला तिथून जायलाही सलमान खान यांनी मनाई केली होती.
आम्ही सोबत जिम करायचो...
स्टारकिडनं पुढे बोलताना सांगितलं की, सलमान खान मला त्यांच्यासोबत जिमला घेऊन जायचे. आम्ही स्विमिंगही करायला जायचो. मला कार-बाईक्स खूप आवडतात. त्यामुळे त्यांनी मला त्यांच्याकडे असलेली एक शानदार कार दाखवली, जी मॉन्स्टर ट्रकसारखी होती. ते मला जंगलात फिरायला घेऊन जायचे. फार्महाऊलवर मी खूप मज्जा केली. तिथे घालवलेला वेळ माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :