Salman Khan Comment on Bharat Pakistan Ceasefire: सलमान खानला (Salman Khan) सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल केलं जात आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराबद्दल त्यांनी दिलासा व्यक्त करणारे ट्विट केले. पण नंतर त्यानं हे ट्वीट डिलीट केलं. सलमाननं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, 'देवाचे आभार, युद्धबंदी झाली…' पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 22 एप्रिल रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. दोन्ही बाजूंकडून सतत होणारा गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ले थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी शनिवारी संध्याकाळी युद्धबंदीची घोषणा केली.

युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर सलमान खाननं ट्वीट केलं आणि नंतर ते डिलीट केलं. युद्धबंदीवर भाष्य केल्याबद्दल अनेक युजर्सनी त्यांच्यावर टीका केली. कारण याआधी सलमाननं दहशतवादी हल्ला, भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरावर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर एकही शब्द बोलला नव्हता. त्यांनी याबद्दल सार्वजनिकरित्या कोणतंही विधान केलेलं नाही किंवा सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलेली नाही.

अनेक युजर्स सलमान खानवर भारतीय सैनिक आणि दहशतवादाला बळी पडलेल्या बलिदानाकडे आणि शौर्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. एका युजरनं असंही लिहिलंय की, सलमानला भारताच्या वेदनांबद्दल बोलण्यापेक्षा पाकिस्तानच्या कल्याणाची जास्त काळजी वाटत होती. गोंधळ इतका वाढला की, सलमाननं अखेर ट्वीट डिलीट केलं.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सलमान खाननं ट्वीट केलेलं 

दरम्यान, सलमान खानच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सलमान खाननं या प्रकरणावर कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही, किंवा त्यानं कोणतंही नवं ट्वीट केलेलं नाही. एका युजरनं लिहिलं, "सलमान खाननं त्याचं ट्विट डिलीट केलंय, पहलगामवर काहीही पोस्ट केलेली नाही. भारतावरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान शाहरुख खान आणि आमिर खान देखील गप्प राहिले."

सलमान खानवर बहिष्कार टाकण्याची मागणी 

दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "भारतानं सलमान खानवर बहिष्कार टाकावा." एका युजरनं लिहिलंय की, "जर पाकिस्तानमध्ये स्फोट झाला असता, तर त्यांनी असं म्हटले असतं का की, भारतानं ते केलं - सलमान खाननं 26/11 रोजी हे ट्वीट केलं होतं आणि नंतर ते डिलीट केले होतं. पहलगामवर सलमाननं एकही ट्वीट केलेलं नाही. भारतावरील दहशतवादी हल्ल्यावर शाहरुख खान, आमिर खानही  - गप्प राहिले. नेहमी लक्षात ठेवा - फाईट बॅक इंडिया."