Salman Khan Bigg Boss 20 Teaser: 'बिग बॉस'च्या (Bigg boss) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी. आता प्रतिक्षा संपली.   'बिग बॉस' (Bigg boss Season 20 Teaser) सिझन 20 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा रिअॅलिटी शो आपल्याला टीव्ही यासह ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.  मेकर्सने 'बिग बॉस' सिझन 20 चा ऑफिशियल प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये रिअॅलिटी शोच्या रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आली आहे.  या रिअॅलिटी शोची घोषणा होताच,  प्रेक्षकांना विशेष आनंद झाला आहे.  दरम्यान, हा रिअॅलिटी शो नेमकं कधी रिलीज होणार? (Salman Khan) जाणून घेऊयात.

Continues below advertisement

सलमान खानचा 'करण अर्जून'वाला अंदाज (Bigg Boss 20 Officially Announced)

'बिग बॉस' सिझन 20चा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   सलमान खानची या प्रोमोमध्ये धमाकेदार एन्ट्री होते.  सलमान खान या प्रोमोमध्ये आपल्या आयकॉनिक लूकमध्ये दिसत आहे. 'करण अर्जून'च्या लूकमध्ये सलमान खानने घोड्याला पकडले असून, आपल्या हटक्या अंदाजात तो एक डायलॉग म्हणतो. 'जे 'करण अर्जून'मध्ये घडलं, ते पुन्हा घडणार... तथास्तू', असं सलमान खान म्हणतो. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सलमान खानने 'बिग बॉस 20'बाबत सांगितलं की, 'बिग बॉसचा प्रत्येक सिझन नवीन खेळ, नवीन डायनामिक्स आणि अनएक्सपेक्टेड ट्विस्ट घेऊन येते.  पण या सिझनमध्ये आपल्याला असे काही ट्विस्ट पाहायला मिळतील, जे मागील सर्व सिझनपेक्षा या सिझनला वेगळे बनवेल. पहिला संकेत तुम्हाला मिळालेला आहे. आणि आता तुम्हाला 2 वेळा लक्षपूर्वक बघणं गरजेचं आहे. टीझर तर फक्त सुरुवात आहे, आता अजून खूप काही होणं बाकी आहे', असं सलमान खान म्हणाला.

Continues below advertisement

कधी अन् कुठे 'बिग बॉस' सिझन 20 पाहता येणार? (Salman Khan Bigg Boss 20 Officially Announced)

'बिग बॉस' सिझन 20, 6  सप्टेंबर 2026 रोजी रिलीज होणार आहे.  हा रिअॅलिटी शो आपण रात्री 9 वाजता जिओहॉटस्टारवर पाहू शकता. तर, कलर्स मराठीवर  रात्री 10:30 वाजता टेलिकास्ट होणार आहे.   मीडिया रिपोर्ट्सनुसार,  या रिअॅलिटी शोमध्ये सोशल मीडिया स्टार्स आणि टीव्ही मालिकेतील काही दिग्गज चेहरे पाहायला मिळतील. रिपोर्ट्सनुसार, 'बिग बॉस' सिझन 20 मध्ये जन्नच जुबैर, उर्फी जावेद, फैसल शेख, अंजली अरोरा हे स्पर्धक असतील.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'प्रत्येक मुलाला रवि किशन व्हावंसं वाटेल'; व्हायरल व्हिडीओंवर अभिनेता नेमकं काय म्हणाला?