Salim Khan Wanted To Be An Actor: दिसायला सुंदर, मोठी स्वप्न आणि त्यासोबतच प्रतिभा असेल, तर बॉलिवूडमध्ये (Bollywood News) जम बसवणं काही अवघड नाही. कधीकधी सगळं नशीबाच्या हातात असतं, असं म्हणतात. पण, त्यापैकी काही माणसं आपलं नशीब स्वतः लिहितात, असंच एका बॉलिवूडच्या दिग्गजासोबत घडलेलं. कित्येक वर्षांपूर्वी एका तरुणाकडे पाहून कोणीही सांगितलं असतं की, अरे हा तर हीरो मटेरियल आहे. यानं इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यावर अभिनेता म्हणून नशीबही आजमावलं. याच्या नशीबात चमकणंच लिहिलेलं, पण अभिनयातून नाहीतर त्याच्या लेखणीतून. प्रेक्षकांना काय हवंय आणि आपण काय लिहिलं पाहिजे, हे यानं खूप आधीच ओळखलेलं. त्यामुळे या व्यक्तीनं जे-जे लिहिलं, त्याच्या लेखणीच्या जादूनं अनेकांचं नशीब उजळलं. यानं त्याची लेखणी उचलली आणि इंडस्ट्रीला अशा कहाण्या दिल्या, ज्या रुपेरी पडद्यावर अजरामर झाल्या. पण, सुपरस्टार बनण्याचं जे स्वप्न होतं, ते मुलानं पूर्ण केलं. आम्ही ज्या व्यक्तीबाबत सांगितलंय की, सलीम खान (Salim Khan). हिंदी सिनेसृष्टीचे (Hindi Industry) दिग्गज 'द सलीम खान'.
सलीम खान यांचं पूर्ण नाव सलीम अब्दुल रशीद खान. यांचे पूर्वज अफगाणिस्तानातून भारतात आलेले आणि त्यानंतर इंदौरमध्ये आपलं बस्तान बसवलं. पण, सलीन खान यांचं लहानपण वाटतं तेवढं सोपं नव्हत. लहानवयातच त्यांनी आपल्या आईला टीबीमुळे गमावलं आणि त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांच्या वडिलांचंही निधन झालं. अवघ्या दहाव्या वर्षी ते अनाथ झाले. सधन कुटुंबातून असूनही सलीम यांनी एकही रुपया न घेता रिकाम्या खिशानं थेट मुंबई गाठली. मरिन ड्राईव्हमधल्या एका गेस्ट हाऊसमध्ये 55 रुपये महिना देऊन अर्धी खोली भाड्यानं घेतली. पोटाची खळगी भरण्यासाठी मॉडलिंग केली आणि त्यानंतर फिल्म्समध्ये लहान-सहान रोल मिळू लागले. 1960 मध्ये 'बारात'मधून त्यांनी पदार्पण केलं, पण हा सिनेमा फारसा यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं, पण कधीही प्रमुख अभिनेता म्हणून स्वतःला स्थापित करू शकले नाही. सलीम खान यांनी स्वतः कबूल केलं की, ते चांगले अभिनेता नव्हते, पण ते पात्र समजून घेण्यात पारंगत होते.
अभिनेता म्हणून संघर्ष केल्यानंतर, सलीम खान यांनी लेखनाचा मार्ग निवडला. त्यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत सलीम-जावेद जोडीची स्थापना केली आणि यामुळे त्यांच्या नशिबात एक महत्त्वाचा टप्पा आला. 'जंजीर', 'दीवार', 'शोले' आणि 'डॉन' सारख्या सिनेमांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एका नव्या युगाची सुरुवात केली. या सिनेमांनी अमिताभ बच्चन यांना 'अँग्री यंग मॅन' म्हणून स्थापित केलं आणि सिनेसृष्टीतल्या लेखकांनाही ओळख मिळवून दिली. सलीम यांनी 1964 मध्ये सलमा यांच्याशी लग्न केलं. नंतर त्यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरी लग्नगाठ बांधली. स्वतःला सुपरस्टार व्हायचं होतं, पण त्यांचं हे स्वप्न त्यांच्या मुलानं पूर्ण केलं. आज सलीम यांचा मुलगा सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
