Salim Khan Health Update: प्रसिद्ध पटकथालेखक आणि सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समोर आल्यानंतर सर्वत्र त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या. आता त्यांच्या तब्येतीबाबत नवी अपडेट समोर आला असून अभिनेत्री डेजी शाह हिने ही माहिती दिली आहे. डेजी ही सलमान आणि त्यांच्या कुटुंबाच्या जवळची मानली जाते.

Continues below advertisement

सलीम खान यांच्यावरचा धोका टळला

सलीम खान यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालय येथे उपचार सुरू होते. त्यांना ‘मिनिमल ब्रेन हॅमरेज’ झाल्याची माहिती समोर आली होती. बातमी कळताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अलीकडेच एका मुलाखतीत डेजी शाह म्हणाली की, “मी अजून वैयक्तिकरित्या रुग्णालयात जाऊन सलीम सरांना भेटले नाही. मात्र मी सलमान सर आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता ते धोक्याबाहेर आहेत.”

Continues below advertisement

सर्जरीच्या चर्चेमुळे निर्माण झाला वाद

याआधी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सांगितल्याची चर्चा होती. मात्र डेजी शाहने शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिल्याने नवीन घडामोड समोर आली आहे. दरम्यान, सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी रुग्णालय प्रशासनाकडून काही माहिती बाहेर गेल्यामुळे सलमान खान आणि खान कुटुंब नाराज असल्याचीही बातमी होती. अशा नाजूक काळात वैद्यकीय माहिती माध्यमांमध्ये का शेअर करण्यात आली, असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केल्याचे सांगितले जाते. सध्या सलीम खान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन घरी परतावेत, अशीच चाहत्यांची आणि सर्वांची अपेक्षा आहे.

सलीम खान यांच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयाकडून अधिकृत मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले होते. डॉक्टर पारकर यांनी माहिती दिली की, सलीम खान यांची एमआरआय, सीटी स्कॅन आणि रक्तचाचण्या करण्यात आल्या. तसेच डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफीही करण्यात आली. त्यांना सकाळी 8 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण खान कुटुंब रुग्णालयात उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच सलमान खान हे शूटिंगमध्ये व्यस्त होते. बातमी कळताच त्यांनी थेट शूटिंगवरून रुग्णालयात धाव घेतली.

भेटीसाठी सेलिब्रिटींची गर्दी

सलीम खान यांची भेट घेण्यासाठी अनेक कलाकार रुग्णालयात पोहोचले. रितेश देशमुख पासून ते शाहरुख खान पर्यंत अनेकांनी त्यांची विचारपूस केली. रुग्णालयात दाखल होताना त्यांचा रक्तदाब (बीपी) वाढलेला होता. त्यांना ‘मिनिमल ब्रेन हेमरेज’ झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यांची प्रकृती सुधारत असून ते हळूहळू बरे होत आहेत. दरम्यान, सलमान खान आणि डेजी शाह यांनी एकत्र काम केले आहे. ते ‘जय हो’ आणि ‘रेस 3’ या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले होते.